‘WHO’ are you? ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाठ

चीनकडे झुकल्याचा आरोप

‘WHO’ are you? ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली पाठ

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिला कार्यकारी आदेश जारी केला. या आदेशानुसार अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून म्हणजेच WHO मधून माघार घेतली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचा प्रभाव असल्याचे वारंवार म्हटले आहे. या संबंधीच्या आदेशांवर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळात ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर जोरदार निशाणा लावला होता. व्हाईट हाऊसमध्ये आदेशावर स्वाक्षरी करताना ट्रम्प म्हणाले की, डब्ल्यूएचओ युनायटेड स्टेट्सविरूद्ध पक्षपाती आहे. येथे चीनला महत्त्व दिले जात आहे. ते म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेने आमची फसवणूक केली आहे.

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जागतिक आरोग्य संघटनेसोबतचे संबंध तोडण्यासाठी आदेश जारी केला आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात असाच आदेश दिला होता, जो बायडन यांच्या प्रशासनात माघारी घेण्यात आला होता. जुलै २०२० मध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांच्यात वाद सुरूच होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोविड- १९ महामारीच्या काळात जगाची दिशाभूल करण्यात चीनला मदत केल्याचा आरोप करत, एका वर्षाच्या आत अमेरिकेतून माघार घेण्याचे संकेत दिले होते, परंतु निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यानंतर जो बायडन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला अधिक अधिकार देण्यास सांगितले.

हे ही वाचा:

मुंबई सेंट्रलला रेल्वे पोलिसांनी पकडला ‘पुष्पा’

परशुराम हिंदू सेवा संघाची राज्य कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न

गायक अमीर हुसेन मगसौदलूला फाशी !

उत्तराखंडमध्ये समान नागरी कायद्याचा मार्ग मोकळा

आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या आदेशानंतर जागतिक आरोग्य संस्थेचे लाखो डॉलर्सचे नुकसान होणार आहे. ट्रम्प यांच्या जागतिक आरोग्य संघटनेला यूएस सरकारचा कोणताही निधी, सहाय्य किंवा संसाधने भविष्यात हस्तांतरित होणार नाहीत. अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक निधी देणारा देश होता”. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागकित आरोग्य संघटनेला मिळणारा निधी कमी होणार आहे. २०२४-२५ च्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात जागतिक आरोग्य संघटनेसाठी ६६२ मिलियन अमेरिकन डॉलर्सच्या निधीची तरतूद करण्यात आली होती.

Exit mobile version