26 C
Mumbai
Friday, February 13, 2026
घरस्पोर्ट्सईशान किशनची प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री पक्की, तिसऱ्या क्रमांकावर खेळणार

ईशान किशनची प्लेइंग इलेव्हनमध्ये एंट्री पक्की, तिसऱ्या क्रमांकावर खेळणार

Google News Follow

Related

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेला बुधवारपासून सुरुवात होतेय. पहिला सामना नागपुरात खेळला जाणार आहे. वनडे सीरिज हरल्यानंतर आता भारतीय संघ टी२० मध्ये दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. टी२० वर्ल्डकपआधी आत्मविश्वास वाढवण्यासाठी ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची मानली जाते.

सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की ईशान किशन पहिल्या टी२० सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

या वक्तव्यानंतर ईशान किशनची तब्बल २६ महिन्यांनंतर भारतीय संघात पुनरागमन जवळपास निश्चित झालं आहे. ईशानने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २८ नोव्हेंबर २०२३ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुवाहाटीत खेळला होता. त्यानंतर तो बराच काळ संघाबाहेर होता. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर आता न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० सीरिजसाठी त्याची पुन्हा निवड झाली आहे.

ईशानची संघात निवड झाली होती, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं सोपं नव्हतं. मात्र तिलक वर्मा दुखापतीमुळे पहिल्या तीन टी२० सामन्यांतून बाहेर असल्याने ईशानसाठी दार उघडलं आहे. तिलकच्या जागीच ईशान तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणार आहे.

विकेटकीपर-फलंदाज म्हणून संजू सॅमसन हा संघाचा पहिला पर्याय असणार आहे. ईशान मुळात ओपनर असला तरी त्याने याआधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मधल्या फळीत खेळण्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची जबाबदारी त्याच्यासाठी मोठी संधी ठरू शकते.

२०२१ मध्ये टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेल्या ईशान किशनने आतापर्यंत ३२ टी२० सामने खेळले असून ३२ डावांत ६ अर्धशतकांच्या मदतीने ७९६ धावा केल्या आहेत. आता नागपुरात होणाऱ्या पहिल्या सामन्यात तो काय करतो, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा