अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गाझा पट्टीतील युद्ध शमवण्याच्या प्रयत्नात असताना इस्रायलने पुन्हा एकदा गाझामधील लोकांना सुरक्षित आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी सांगितले की, इस्रायल सैन्याकडून शहराला वेढा घातला असल्याने लोकांनी दक्षिणेकडे जावे असे सांगण्यात आले आहे.
गाझा रहिवाशांनी दक्षिणेकडे जावे आणि गाझा शहरामध्ये हमासच्या दहशतवाद्यांना एकटं सोडावं आणि ही शेवटची संधी असल्याचे काट्झ यांनी सांगितले. तसेच त्यांनी इशारा दिला आहे की, जे शहरात राहतील त्यांना दहशतवादी किंवा दहशतवादी समर्थक मानले जाईल. काट्झ पुढे म्हणाले की, लष्कराने मध्य गाझाला पश्चिम किनाऱ्याशी जोडणारा नेत्झारिम कॉरिडॉर ताब्यात घेतला आहे, त्यामुळे गाझाच्या उत्तर आणि दक्षिण भागाचा संपर्क तुटला आहे. गाझा शहर सोडून दक्षिणेकडे जाणाऱ्या लोकांनाही इस्रायली लष्करी चौक्यांमधून जावे लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा :
पीओकेमध्ये हिंसक आंदोलन; पाक सैन्याच्या गोळीबारात १२ ठार!
गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर
… म्हणून ऐश्वर्या- अभिषेक बच्चन यांनी युट्युबकडून ४ कोटींची नुकसानभरपाई मागितली
इलेक्ट्रॉनिक्स कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग योजनेला प्रचंड प्रतिसाद
दरम्यान, गाझा शहरातील अल-शिफा रुग्णालयाच्या परिसरात आश्रय घेतलेल्या ६० वर्षीय रबाह अल- हलाबी यांनी सांगितले की, आपण हे शहर सोडणार नाही कारण दक्षिण गाझा पट्टीतील परिस्थिती ही काही इकडच्या भागापेक्षा वेगळी नाही. सर्वचं क्षेत्रे धोकादायक असून सर्वत्र बॉम्बस्फोट होत आहेत. आम्ही मृत्यूची वाट पाहत आहोत किंवा युद्धविराम होण्याची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले.







