28.4 C
Mumbai
Friday, October 30, 2026
घरदेश दुनियाप्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले

प्रकृतीवर प्रश्न विचारताच ट्रम्प पत्रकारावर संतापले

शरीरयष्टीवर केली वैयक्तिक टिपण्णी

Google News Follow

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रकृतीविषयी प्रश्न विचारणाऱ्या रॉयटर्सच्या पत्रकारावर वैयक्तिक टीका केली. ‘तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवा, तुम्ही वाईट दिसत आहात’, अशा शब्दांत ट्रम्प यांनी पत्रकाराच्या शरीरयष्टीवर टिप्पणी केली. कॅन्सस आणि आयोवा येथील नियोजित प्रचारसभा रद्द करण्यामागे प्रकृती अस्वास्थ्याचे कारण आहे का, असा प्रश्न पत्रकाराने विचारला होता. त्यावर ट्रम्प यांनी संताप व्यक्त करत आपण पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे सांगितले.

ही घटना गुरुवारी (२९ ऑक्टोबर) पत्रकारांशी संवाद साधताना घडली. रॉयटर्सचे पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, कॅन्ससमधील नियोजित प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय हा सततच्या प्रवासामुळे किंवा प्रकृती ठीक नसल्यामुळे घेतला आहे का? यावर ट्रम्प यांनी, ‘हा प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही आजारी आहात. तुम्ही कोणत्या माध्यमातून आहात?’ असा प्रतिप्रश्न केला. पत्रकाराने आपण रॉयटर्सचे प्रतिनिधी असल्याचे सांगितल्यानंतर ट्रम्प यांनी पत्रकाराची नक्कल देखील केली.

पत्रकाराने आपण केवळ त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असल्याचे स्पष्ट केले. मात्र, ट्रम्प यांनी त्याच्या शरीरयष्टीवर टिप्पणी करण्यास सुरुवात केली. ‘या व्यक्तीकडे पाहा, तो किती अनफिट आहे’, असे म्हणत त्यांनी पत्रकाराची खिल्ली उडवली. त्यानंतर ‘मी गेल्या दोन आठवड्यांपासून प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहे. मला काहीही झालेले नाही. मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. तुम्ही स्वतःला तंदुरुस्त ठेवा. तुम्ही वाईट दिसत आहात’, असे ट्रम्प म्हणाले.

हे ही वाचा:

भूतानमध्ये हिमनदी तलाव फुटला

नागपूर पदवीधर मतदार संघाने काँग्रेसची लाज राखली

मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

मॉस्कोच्या दिशेने युक्रेनचे ड्रोन हल्ले

दरम्यान, ट्रम्प यांनी शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी कॅन्ससमधील सॅलिना आणि रविवार, १ नोव्हेंबर रोजी आयोवातील ड्युब्यूक येथे होणाऱ्या प्रचारसभा रद्द केल्या आहेत. या सभांमधून त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचार करायचा होता. कॅन्ससमध्ये सिनेटर रॉजर मार्शल यांच्यासाठी ट्रम्प प्रचार करणार होते. मात्र, मार्शल यांची स्थिती चांगली असल्याने आपल्याला तिथे प्रत्यक्ष जाण्याची गरज नसल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा