28.2 C
Mumbai
Thursday, August 6, 2026
घरदेश दुनियाट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

ट्रम्प थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टर- प्रवासी विमान समोर येताच काय घडले?

उड्डाणादरम्यान मोठी दुर्घटना टळली

Google News Follow

Related

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेऊन जाणाऱ्या ‘मरीन वन’ या राष्ट्राध्यक्षीय हेलिकॉप्टरचा आणि एका प्रवासी विमानाचा थोडक्यात अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. वॉशिंग्टनजवळील रॉनल्ड रीगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ परिसरात ही दुर्घटना घडणार होती. या घटनेनंतर अमेरिकेची फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) यांनी चौकशी सुरू केली आहे.

मंगळवारी दुपारी ट्रम्प यांचे मरीन वन हेलिकॉप्टर व्हाईट हाऊसमधून जॉइंट बेस अँड्र्यूजकडे रवाना झाले होते. त्याचवेळी Envoy Air Flight 3742 हे प्रादेशिक प्रवासी विमान रॉनल्ड रीगन विमानतळावरून उड्डाण करत होते. दोन्ही विमानांमधील आवश्यक सुरक्षित अंतर काही काळ राखले गेले नाही, त्यामुळे हा ‘लॉस ऑफ सेपरेशन’चा प्रकार मानला जात आहे. मात्र, दोन्ही विमानांची दिशा एकमेकांकडे नव्हती आणि कोणतीही टक्कर झाली नाही. दोन्ही विमानांनी सुरक्षितपणे आपला प्रवास पूर्ण केला.

FAA च्या नियमांनुसार अशा परिस्थितीत विमानांमध्ये किमान १.५ मैल आडवे आणि ५०० फूट उभे अंतर राखणे बंधनकारक असते. प्राथमिक माहितीनुसार, मरीन वनच्या उड्डाणादरम्यान व्यावसायिक विमानांची उड्डाणे तात्पुरती थांबवण्याची प्रक्रिया योग्य प्रकारे राबवली गेली नसावी, अशी शक्यता तपासली जात आहे.

हे ही वाचा:

“बांगलादेश दुसरा पाकिस्तान बनत आहे”

सुनेत्रा पवार प्रकरणावरून धनंजय मुंडेंना सुनील तटकरेंचा इशारा

अनधिकृत स्पर्धांवर पीसीबीचा चाप

पाकिस्तानसे गिरे, खजूर भारत मे अटके…किंमत ३ कोटी

जानेवारी २०२५ मध्ये याच रॉनल्ड रीगन विमानतळाजवळ प्रवासी विमान आणि लष्करी हेलिकॉप्टरची हवेत धडक होऊन ६७ जणांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर FAA ने राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टरच्या हालचालीदरम्यान व्यावसायिक विमानांची उड्डाणे थांबवण्यासह अनेक कडक सुरक्षा नियम लागू केले होते. FAA आणि NTSB या दोन्ही संस्था हवाई वाहतूक नियंत्रण प्रणालीतील समन्वय, नियंत्रण कक्षातील संवाद, तसेच सुरक्षा प्रक्रियेचे पालन झाले की नाही, याचा तपास करत आहेत. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ध्वनिमुद्रिकांचीही तपासणी केली जाणार असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी अतिरिक्त उपाययोजनांचा विचार केला जाईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा