अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या बहुचर्चित व्यापार धोरणाचे समर्थन केले आहे. याशिवाय त्यांनी म्हटले आहे की, ‘टॅरिफ’ हा शब्दकोशातला त्यांचा आवडता शब्द आहे आणि अमेरिकेला श्रीमंत बनवण्याचे श्रेय त्यालाचं जाते. त्यांनी असा युक्तिवाद केला की, इतर अनेक राष्ट्रे वर्षानुवर्षे अमेरिकेचा फायदा घेत आहेत, परंतु व्यापारी भागीदारांवरील त्यांच्या शुल्कामुळे व्यापारात निष्पक्षता परत आली आहे.
“मला टॅरिफ शब्द खूप आवडतो. सर्वात सुंदर शब्द आहे. आपण श्रीमंत होत चाललो आहोत. सर्वोच्च न्यायालयासमोर आपला एक मोठा खटला आहे, परंतु मी त्याची कल्पनाही करू शकत नाही कारण इतर राष्ट्रांनी आपल्याशी असेच केले आहे,” असे क्वांटिको येथील मरीन कॉर्प्स बेसवर बोलताना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले. ट्रम्प यांनी दावा केला की त्यांच्या टॅरिफ धोरणाअंतर्गत अमेरिका ट्रिलियन डॉलर्स कमवत आहे. ट्रम्प म्हणाले की, “आपण अब्जावधी डॉलर्स गुंतवले आहेत. आपण पुन्हा श्रीमंत झालो आहोत. इतर देश वर्षानुवर्षे आपला गैरफायदा घेत होते पण, आता आपण त्यांना योग्य वागणूक देत आहोत. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या नियोजित सुनावणीपूर्वी ट्रम्प यांचे हे विधान आले.
हे ही वाचा :
बरेली हिंसाचार: तौकीर रझाचे दोन सहकारी गोळीबारात जखमी, अटक!
लढाऊ विमानांसाठी एचएएलला जीई-४०४ जेट इंजिन
‘दुबईच्या शेख’साठी शोधत होता सावज! चैतन्यानंद सरस्वतीच्या फोनमध्ये आणखी काय सापडले?
बॉलिवूड अभिनेता विशाल ब्रह्मा ४० कोटींच्या ड्रग्जसह पकडला!
भारत आणि ब्राझील सारख्या देशांना अलिकडच्या काही महिन्यांत अमेरिकेने उच्च शुल्क आकारले आहे आणि जर व्यापारी भागीदारांनी अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादले तर आणखी परस्पर शुल्क लागू शकतात असा इशारा दिला. विरोध असूनही, ट्रम्प यांनी आग्रह धरला की या अतिरिक्त शुल्कांचे परिणाम मिळत आहेत. आम्ही अब्जावधी डॉलर्स घेतले आहेत. यापूर्वी कधीही अशी संपत्ती अस्तित्वात नव्हती, असे ते म्हणाले.







