भारत आपल्यासमोर झुकत नाहीए म्हटल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिथरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी प्रकरणी भारतावर अतिरिक्त शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे. भारताने आणि रशियाने अमेरिकेच्या या निर्णयाला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ट्रम्प यांचा २४ तासांत शुल्क वाढवण्याचा इशारा
ट्रम्प यांनी सीएनबीसीशी बोलताना म्हटले, “भारत आमच्यासाठी चांगला व्यापार भागीदार नाही. ते आमच्यासोबत खूप व्यापार करतात, पण आम्ही त्यांच्या उत्पादनांची आयात करत नाही. त्यामुळे २५% शुल्क लावले आहे, पण पुढील २४ तासांत ते अधिक वाढवण्याचा विचार करतो आहोत.”
भारताच्या रशियाकडून तेल खरेदीमुळे “रशियन युद्ध मशीनला इंधन पुरवले जात आहे”, असा आरोप ट्रम्प यांनी केला.
भारत व रशियाचे प्रत्युत्तर:
भारताने अमेरिकेला सुनावले की, “आपण आम्हाला एकटे लक्ष्य करत आहात, पण स्वतः अमेरिका व युरोपियन युनियन रशियासोबत मोठ्या प्रमाणात व्यापार करत आहेत.भारताचे रशियाकडून तेल खरेदी करणे हे “भारतीय ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात इंधन उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक आहे” असेही भारताने स्पष्ट केले आहे.
रशियाचा समर्थनार्थ आवाज
रशियाच्या क्रेमलिन प्रवक्त्या दिमित्री पेस्कोव यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याला अवैध ठरवले. पेस्कोव म्हणाले, “रशियाशी व्यापार बंद करण्यासाठी भारतासारख्या देशांवर दबाव आणण्याचे प्रयत्न हे बेकायदेशीर आहेत. भारताला कोणाशी व्यापार करायचा याचा निर्णय स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार आहे.
हे ही वाचा:
जनधन योजनेमुळे आर्थिक सेवा गरिबांपर्यंत पोहोचल्या
टीबीसाठी अत्यंत घातक आहे डायबेटीस
धावपळीच्या जीवनशैलीत निरोगी राहण्यासाठी स्वीकारा ‘नैसर्गिक उपाय’
कबुतरांचे संरक्षण आणि नागरी आरोग्य यामध्ये संतुलन साधण्याचे प्रयत्न!
ट्रम्प यांची वारंवार टीका:
ट्रम्प यांनी Truth Social वर लिहिले होते की, “भारत रशियन तेल विकून मोठा नफा कमावत आहे आणि त्यांना युक्रेनमध्ये लोक मरत आहेत याची पर्वा नाही.”
त्यांनी भारत व रशियाला “मृत अर्थव्यवस्था” असे संबोधले.
भारताचा ठाम पवित्रा:
भारताने स्पष्ट केले की, “आमचे परराष्ट्र धोरण हे राष्ट्रीय हित व आर्थिक सुरक्षेच्या आधारावर ठरते. अन्यायकारक व दुहेरी भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो.”
निक्की हेली यांची ट्रम्पवर टीका
अमेरिकेच्या माजी संयुक्त राष्ट्र राजदूत निक्की हेली यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताच्या निर्यातींवर उच्च दराने शुल्क लावण्याच्या प्रस्तावावर जोरदार फटकारले आहे. त्यांनी म्हटले की, अशा पावलामुळे “अमेरिका-भारत संबंधांमध्ये तणाव निर्माण होईल आणि तेही अत्यंत महत्त्वाच्या काळात.”
निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाची दुटप्पी भूमिका उघड केली, जिथे चीनला 90 दिवसांची टॅरिफ सूट दिली गेली आहे, पण मित्रदेश भारतावर दंडात्मक शुल्क लावले जात आहे.
X वर त्यांनी लिहिले आहे की, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, पण चीन, जो आमचा शत्रू आहे तो रशियन व इराणी तेलाचा सर्वात मोठा ग्राहक आहे, त्याला ९० दिवसांची शुल्क सूट मिळते आहे. चीनला सूट देऊ नका आणि भारतासारख्या विश्वासू मित्रासोबतचे नाते उद्ध्वस्त करू नका.
भारत-चीन संदर्भात हेलींचा जोर:
हेली यांनी अनेकदा भारतासोबत घनिष्ठ भागीदारी वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे, विशेषतः चीनच्या जागतिक प्रभावाला रोखण्यासाठी. त्यांनी म्हटले की, “इंडो-पॅसिफिकमधील लोकशाही देशांसोबत मजबूत संबंध ठेवणे अमेरिकेच्या हिताचे आहे.”
ट्रम्प यांना राजकीय इशारा:
हेली यांच्या मते, भारतावर शुल्क लावणे म्हणजे “अमेरिकेचा मित्र गमावणे आणि चीनला अप्रत्यक्षपणे बळकट करणे.







