एका महत्त्वपूर्ण अशा समन्वित हद्दपारी मोहिमेत, अमेरिकेने २०० भारतीय नागरिकांना परत पाठवले आहे. विशेष म्हणजे यात गुंड अनमोल बिश्नोई, पंजाबमध्ये हवे असलेले दोन फरार गुन्हेगार आणि १९७ कागदपत्रे नसलेले स्थलांतरित यांचा समावेश आहे. अमेरिकेहून आधीच निघालेले हे विमान बुधवारी सकाळी १० वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तुरुंगात बंद असलेल्या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ बिश्नोई हा महाराष्ट्रातील माजी मंत्री बाबा सिद्दीकीची हत्या आणि एप्रिल २०२४ मध्ये अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारासह भारतातील अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणांमध्ये हवा आहे. गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की, अनमोल एप्रिल २०२२ मध्ये बनावट पासपोर्ट वापरून भारतातून पळून गेला होता. तो बनावट रशियन कागदपत्रांवर प्रवास करत होता, अमेरिका आणि कॅनडामध्ये फिरत होता आणि अखेर त्याला शोधून ताब्यात घेण्यात आले. तो परदेशातून एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मद्वारे टोळी कारवाया चालवत होता असा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे.
हे ही वाचा:
दोन गटांत फुटलेली काँग्रेस राहुल गांधींना वाचवण्यात गुंतली
आर. माधवनचा काय आहे लुक टेस्टचा किस्सा ?
मुलींनी माहेरात किती दिवस-तास राहावं?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक आश्वासनाचा भाग म्हणून बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई सुरू केली. जानेवारी २०२५ ते मे २०२५ पर्यंत अमेरिकेने शेकडो भारतीयांना हद्दपार केले आहे. भारत सरकारने या मोहिमेत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, परंतु पडताळणी प्रक्रिया अनिवार्य असल्याचेही म्हटले. पंतप्रधान मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये म्हटले होते की, भारत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना परत घेण्यास तयार आहे.







