23.8 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरदेश दुनियाहल्ल्यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह अटक

हल्ल्यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना पत्नीसह अटक

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

अमेरिकेसोबत वाढत्या तणावादरम्यान, शनिवारी पहाटे व्हेनेझुएलाची राजधानी कराकसमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू आले. तसेच आकाशात धुराचे लोट दिसून आले. यानंतर हे हल्ले अमेरिकन सैन्याने केल्याचे समोर आले आहे. अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलावर केलेल्या मोठ्या हल्ल्यात, राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना पकडण्यात आले आणि देशाबाहेर नेण्यात आले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवर या कारवाईची पुष्टी केली आहे. त्यांनी म्हटले आके की, अमेरिकेने व्हेनेझुएलावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला पकडून देशाबाहेर नेले. ट्रम्प म्हणाले की ही कारवाई अमेरिकन एजन्सींच्या सहकार्याने करण्यात आली.

शनिवारी मध्यरात्रीनंतर, व्हेनेझुएलाची राजधानी कराकस स्फोटांच्या जोरदार आवाजाने हादरली. स्थानिक वेळेनुसार पहाटे १:५० च्या सुमारास राजधानीच्या वेगवेगळ्या भागात किमान सात मोठे स्फोट ऐकू आले. वृत्तांनुसार, कराकसवरून कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांचा आवाज ऐकू आला. याव्यतिरिक्त, किमान चार इतर शहरांमध्ये हल्ल्यांचे वृत्त आहे. हा संपूर्ण हल्ला सुमारे ३० मिनिटे चालला.

हे ही वाचा:

छत्तीसगडच्या सुकमा, बीजापूरमध्ये १४ नक्षलवादी मारले!

“हातात पदवी, खिशात आरडीएक्स असलेला व्हाईट कॉलर दहशतवाद देशासाठी धोकादायक”

चाकू, हातोडे, हातमोजे आणि… इस्लामी कट्टरतावाद्याचा कट उधळला

“मोदी सरकार हटवण्यासाठी बांगलादेशसारखी निदर्शने आवश्यक”

अहवालांनुसार, ही कारवाई अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. हा हल्ला केवळ हवाई हल्ला नव्हता तर त्यात अमेरिकन कायदा अंमलबजावणी संस्था आणि विशेष दलांचाही समावेश होता. ऑपरेशन्समध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून अमेरिकेने प्रथम व्हेनेझुएलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला लक्ष्य करून नष्ट केले होते असे मानले जाते. कराकसमधील सर्वात मोठे लष्करी संकुल असलेल्या फुएर्टे ट्युना येथून धुराचे लोट उठतानाही दिसून आले. शहराच्या अनेक भागात वीज खंडित झाली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा