25 C
Mumbai
Thursday, January 8, 2026
घरदेश दुनिया'अमेरिका चालवणार व्हेनेझुएलाचा कारभार'

‘अमेरिका चालवणार व्हेनेझुएलाचा कारभार’

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले स्पष्ट

Google News Follow

Related

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी सांगितले की, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करण्याच्या  अमेरिकेच्या लष्करी कारवाईनंतर, अमेरिका सध्या व्हेनेझुएलाचे प्रशासन चालवणार आहे.

फ्लोरिडामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी दावा केला की, योग्य संक्रमण प्रक्रिया राबवली जाईपर्यंत अमेरिका त्या देशावर देखरेख करेल. मात्र, ही प्रक्रिया नेमकी कशी असेल याचा तपशील त्यांनी दिला नाही.

हे ही वाचा:

उपराष्ट्रपतींनी श्रीशक्ती अम्मांच्या सेवाभावी कार्याचे केले कौतुक

विवान कारूळकरच्या ‘सनातनी तत्त्व’ला भरघोस प्रतिसाद

बांगलादेशात कट्टरपंथ्यांच्या बळी ठरला आणखी एक हिंदू

भारतीय सेनेचा विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम

ट्रम्प म्हणाले, सुरक्षित, योग्य आणि विवेकी बदल होईपर्यंत आम्ही हा देश चालवणार आहोत.”

ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात करताना ‘ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह’ या सांकेतिक नावाने झालेल्या अमेरिकन लष्करी कारवाईचे कौतुक केले. त्यांनी या मोहिमेला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात प्रभावी, शक्तिशाली आणि यशस्वी लष्करी कारवायांपैकी एक असे संबोधले.

ते पुढे म्हणाले, जगातील कोणताही देश इतक्या कमी वेळात अमेरिकेने जे साध्य केले, ते करू शकत नाही.”

ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन लष्कर आणि कायदा अंमलबजावणी संस्थांच्या संयुक्त कारवाईत व्हेनेझुएलाच्या सर्व लष्करी क्षमतांना निष्प्रभ करण्यात आले आणि मध्यरात्रीच्या सुमारास मादुरो यांना अटक करण्यात आली.

ट्रम्प यांनी मादुरो यांचे नेतृत्व भयानक आणि धक्कादायक आहे, असे वर्णन केले आणि ही कारवाई व्हेनेझुएलामध्ये शांतता व स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी केल्याचे सांगितले.

ते म्हणाले, आम्हाला व्हेनेझुएलाच्या महान जनतेसाठी शांतता, स्वातंत्र्य आणि न्याय हवा आहे. अमेरिकेत राहणाऱ्या अनेक व्हेनेझुएलावासीयांना आपल्या मायदेशी परतायचे असल्याचाही दावा ट्रम्प यांनी केला.

व्हेनेझुएलामध्ये दुसरा कोणी सत्तेत येऊन पुन्हा जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष करू नये, यासाठी अमेरिका सतर्क असल्याचे ट्रम्प म्हणाले. दशकानुदशके जे घडले, त्यानंतर पुन्हा अशी चूक आम्ही होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या प्रचंड तेलसाठ्यांशी या कारवाईचा संबंध जोडत, अमेरिकन तेल कंपन्या त्या देशाच्या पुनर्बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे सांगितले.

“जगातील सर्वात मोठ्या अमेरिकन तेल कंपन्या तिथे जातील, अब्जावधी डॉलर्स गुंतवतील, उद्ध्वस्त तेल पायाभूत सुविधा दुरुस्त करतील आणि देशासाठी उत्पन्न निर्माण करतील,”
असे ट्रम्प म्हणाले. गरज भासल्यास आणखी मोठी लष्करी कारवाई करण्यास अमेरिका तयार असल्याचाही इशारा त्यांनी दिला.

“आवश्यक असल्यास आम्ही दुसरा आणि अधिक मोठा हल्ला करण्यास सज्ज होतो. तो आखण्यातही आला होता, मात्र त्याची गरज पडली नाही,” असे ट्रम्प यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा