भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जबरदस्त तणाव असून भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करेल अशी भीती सध्या पाकिस्तानला आहे. यावर पाकिस्तानातून वारंवार प्रतिक्रिया येत आहेत. अशातचं पाकिस्तानच्या काही मशिदींमधून वेगळेच सूर बाहेर पडत असून यामुळे पाकिस्तानच्या चिंता आणखी वाढल्या आहेत. या मशिदींमधून पाकिस्तान विरोधात बोलले जात असून भारताच्या बाजूने मात्र सकारात्मक बाजू दिसून येत आहे.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील एका मशिदीचे मौलाना मोहम्मद रंगीला यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावावर भाष्य करताना पाकिस्तान सरकार आणि लष्करावर आपला रोष व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मी हे शपथ घेऊन सांगतो की, जर भारतीय सैन्याने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही भारताला पाठिंबा देऊ.” मौलाना मोहम्मद रंगीला यांच्या या विधानामुळे पाकिस्तानला मोठा दणका बसला आहे. मशिदीचे मौलाना मोहम्मद रंगीला यांनी भारताने हल्ला केल्यास भारतीय सैन्यासोबत उभे राहण्याची प्रतिज्ञा केली.
खैबर पख्तूनख्वा हा तोच भाग आहे जिथे तहरीक-ए-तालिबानचे वर्चस्व आहे. एक काळ असा होता जेव्हा पाकिस्तानी सैन्य लोकांना इथे राहू देत नव्हते म्हणूनच आता येथील लोक पाकिस्तानी सैन्याला नाही तर भारतीय सैन्याला मदत करण्याबद्दल बोलत आहेत.
हेही वाचा..
मीठी नदी स्वच्छता घोटाळा : मुंबई पोलिसांकडून पहिली एफआयआर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर राजकारण नको
पाकची लाज निघाली; संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ना ठराव आला ना निवेदन
मॉक ड्रील घ्या, सायरन वाजवा! उद्या देशात होणार युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’
दुसरीकडे, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील प्रसिद्ध लाल मशिदीमधूनही अशाच प्रकारची भाषा बोलली जात आहे. १९६० च्या दशकात बांधलेली इस्लामाबादची लाल मशीद प्रसिद्ध आहे. मौलाना अब्दुल अजीज गाझी हे येथील इमाम असून त्यांनी मोठे विधान केले आहे. भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानी सरकार आणि सैन्याला पाठिंबा देण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यांच्या एका भाषणात त्यांनी पाकिस्तानवर मोठा आरोप केला आणि म्हटले की, भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये मुस्लिमांवर जास्त अत्याचार होत आहेत. मौलाना गाझी यांनी पाकिस्तानच्या लोकांना आवाहन केले आणि सांगितले की, पाकिस्तानचे हे युद्ध इस्लामच्या रक्षणासाठी नाही. उलट, हा फक्त राष्ट्रवादाचा लढा आहे. त्यामुळे आपल्याला यात सहभागी होण्याची गरज नाही. याशिवाय, जेव्हा इस्लामाबादच्या लाल मशिदीच्या मौलानांनी मशिदीत उपस्थित असलेल्या शेकडो लोकांना विचारले की भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानी सैन्य आणि सरकारला कोण पाठिंबा देईल? यावेळी कोणीही हात वर केला नाही. यामुळे पाकिस्तान सरकार आणि सैन्याला देशांतर्गतचं विरोध असल्याचे स्पष्ट होत आहे.







