25 C
Mumbai
Sunday, January 11, 2026
घरदेश दुनियापहलगाम हल्ल्यानंतर तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान काय म्हणाले?

पहलगाम हल्ल्यानंतर तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान काय म्हणाले?

पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केल्या

Google News Follow

Related

तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला खूपच त्रासदायक आणि दुःखद घटना असल्याचे म्हटले आहे. शिवाय भारताने जबाबदारीने कारवाई करावी असे आवाहन केले आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान म्हणाले की त्यांचा देश भारताविरुद्ध ठामपणे उभा आहे.

“पहलगाम घटनेतील जीवितहानी अत्यंत अस्वस्थ करणारी आणि दुःखद आहे. मी पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो,” असे इम्रान खान यांनी त्यांच्या एक्स हँडलवर म्हटले. “पुलवामा ऑपरेशनची घटना घडली, तेव्हा आम्ही भारताला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ऑफर दिली होती परंतु भारत कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरला. मी २०१९ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे, पहलगाम घटनेनंतर पुन्हा तेच घडत आहे. आत्मपरीक्षण आणि तपास करण्याऐवजी, मोदी सरकार पुन्हा एकदा पाकिस्तानवर दोषारोप करत आहे,” असे इम्रान खान म्हणाले. १.५ अब्ज लोकसंख्येचा देश असल्याने, भारताने ‘अणुस्फोट बिंदू’ (nuclear flashpoint) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाशी गोंधळ घालण्याऐवजी जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

“शांतता ही आमची प्राथमिकता आहे पण ती भ्याडपणा समजू नये. २०१९ मध्ये संपूर्ण राष्ट्राच्या पाठिंब्याने माझ्या सरकारने केलेल्या कोणत्याही भारतीय प्रयासाला योग्य उत्तर देण्याची सर्व क्षमता पाकिस्तानकडे आहे. संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांद्वारे हमी दिलेल्या काश्मिरींच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचे महत्त्व मी नेहमीच अधोरेखित केले आहे,” असे अनेक प्रकरणांमध्ये ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात असलेले इम्रान खान म्हणाले. पुढे ते म्हणाले की, एक पाकिस्तानी राष्ट्र म्हणून ठामपणे उभे आहोत आणि मोदींच्या युद्धखोरीचा आणि प्रादेशिक शांततेला धोका निर्माण करणाऱ्या त्यांच्या धोकादायक महत्त्वाकांक्षांचा तीव्र निषेध करतो.

हे ही वाचा : 

माजी रॉ प्रमुख आलोक जोशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे प्रमुख

‘तारीख पे तारीख…’ चित्रपट झाला ३२ वर्षांचा !

“आतंक का साथी राहुल गांधी” अमेठीत राहुल गांधींच्या दौऱ्यानिमित्त का लागले पोस्टर्स?

‘हाउसफुल ५’ च्या टीझरने वाढवला सस्पेन्स

सत्ताधारी पीएमएल-एनचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ झरदारी यांच्यावर टीका करताना इम्रान खान म्हणाले की, “नवाज शरीफ आणि आसिफ झरदारी यांच्यासारख्या स्वार्थी व्यक्तींकडून कोणत्याही कडक भूमिकेची अपेक्षा करणे मूर्खपणाचे आहे. ते कधीही भारताविरुद्ध बोलणार नाहीत कारण त्यांची बेकायदेशीर संपत्ती आणि व्यावसायिक हितसंबंध परदेशात आहेत. ते परदेशी गुंतवणुकीतून नफा कमावतात आणि त्या आर्थिक हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी, परकीय आक्रमण आणि पाकिस्तानवरील निराधार आरोपांसमोर ते गप्प राहतात.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
286,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा