23 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरदेश दुनियाब्रिटनमध्ये पेट्रोल पंपांवर सैनिक पाठवण्याची वेळ का आली?

ब्रिटनमध्ये पेट्रोल पंपांवर सैनिक पाठवण्याची वेळ का आली?

Google News Follow

Related

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी परिस्थिती सुधारत असल्याचे सांगूनही, ब्रिटीश सैनिकांना रिकाम्या पंपांची भरपाई करण्यासाठी टँकर चालवावे लागणार आहेत.

तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल रिफायनरीजमधून पेट्रोल पंपांवर नेण्यासाठी पुरेसे टँकर ड्रायव्हर्स नसल्याचा इशारा दिल्यानंतर, जवळजवळ आठवडाभरापासून साठेमारी करणाऱ्या गर्दीने ब्रिटनला ग्रासले आहे.

व्यापार मंत्री क्वासी क्वार्टेंग म्हणाले की, १५० सैनिकांची जमवाजमव करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात ते टँकर चालवायला सुरवात करतील. “गेले काही दिवस कठीण होते, आम्ही मोठ्या रांगा पाहिल्या आहेत. पण मला वाटते की परिस्थिती स्थिर होत आहे. मला वाटते की आपण यातून योग्य मार्ग काढू.” असं क्वार्टेंग म्हणाले.

जॉन्सन यांनी ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी असे सांगितले आहे की पुरवठा सामान्य होत आहे आणि लोकांनी भीतीपोटी खरेदी करू नये.

हे ही वाचा:

…आणि अखेर चीनची अर्थव्यवस्था मंदावली

काय घडलं अमित शहा-अमरिंदर सिंग भेटीत?

‘ही’ भागीदारी संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रात क्रांती आणेल

‘दिल्लीतील कोणाचीतरी हकालपट्टी करावी’…काँग्रेस नेत्याचा घरचा आहेर

सुमारे १ लाख ड्रायव्हर्सच्या कमतरतेमुळे तेल पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. ख्रिसमसच्या वेळी रिकाम्या दुकानांचे आणि किंमती वाढण्याचा धोका वाढला ​​आहे.

येत्या कालावधीत समस्या उद्भवणार नाहीत याची हमी देऊ शकता का, असे विचारल्यावर क्वार्टेंग म्हणाले की, “मी कशाचीही हमी देत ​​नाही. मी एवढेच म्हणत आहे, मला वाटते की परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येळ.”

ब्रिटनने या वर्षाच्या सुरुवातीला ईयू सिंगल मार्केट (युरोपियन युनियन) सोडले, ज्यामुळे ब्रिटिश कंपन्यांना ड्रायव्हर्सची भरती करण्यापासून रोखले. कमतरतेवर मात करण्यासाठी, सरकारने म्हटले आहे की ते ५ हजार परदेशी चालकांना तात्पुरते व्हिसा देऊ करतील.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा