एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू असतानाचं आता दुसरीकडे बांगलादेशच्या हालचालींमुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे. भारत- बांगलादेश सीमेजवळील बांगलादेशातील लालमोनिरहाट विमानतळ चीन विकसित करण्याची शक्यता आहे. बांगलादेशने चीनला हे काम करण्यास सांगितले आहे.
बांगलादेश सरकार नागरी विमानतळ म्हणून विकसित करत असलेल्या भारत- बांगलादेश सीमेजवळील बांगलादेशातील लालमोनिरहाट एअरबेसला चिनी अधिकाऱ्यांनी अलीकडेच भेट दिल्याचे वृत्त आहे. रंगपूर विभागात स्थित लालमोनिरहाट एअरबेस हा सिलिगुडी कॉरिडॉर म्हणजेच भारतातील ‘चिकन्स नेक’ कॉरिडॉरपासून फक्त २० किमी अंतरावर आहे. १९३१ मध्ये ब्रिटिश सरकारने हा लष्करी तळ म्हणून बांधला होता आणि दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांनी पूर्व आघाडीवर त्यांच्या ऑपरेशन्ससाठी फॉरवर्ड एअरबेस म्हणून हा वापरला होता. स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर, बांगलादेश हवाई दलाने या तळाचा वापर केला. २०१९ मध्ये, बांगलादेश एरोस्पेस आणि एव्हिएशन विद्यापीठाला कायमस्वरूपी कॅम्पस बांधण्यासाठी तळातील एक भूखंड देण्यात आला.
यानंतर, अलिकडेच बांगलादेशच्या अंतरिम सरकारने ते नागरी विमानतळ म्हणून विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. माहितीनुसार, मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी चीनला विमानतळ विकसित करण्यास सांगितले आहे. या विमानतळाचे काम या वर्षी ऑक्टोबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे आणि चीन या कामासाठी एका पाकिस्तानी कंपनीला उप-कंत्राटदार म्हणून नियुक्त करेल, अशीही माहिती देण्यात आली आहे. गेल्या महिन्यात त्यांच्या चीन भेटीदरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. याचं भेटीदरम्यान, युनूस यांनी वादग्रस्त विधान केले होते की, बांगलादेश हा संपूर्ण प्रदेशात महासागराचा एकमेव संरक्षक आहे.
हे ही वाचा :
मेहबुबा मुफ्ती सीमेपलिकडे बसलेल्यांना का खुश करत आहेत?
‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार!
“पाक सध्या प्रोबेशनवर; वर्तन सुधारल्यास ठीक अन्यथा कठोर शिक्षा देणार!”
“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”
भारताच्या पूर्व आणि ईशान्य भागात, जेथे सिलिगुडी कॉरिडॉरही आहे असून येथे लष्करी उपस्थिती आहे. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ति कॉर्प्सचे मुख्यालय सिलिगुडीजवळ आहे. पश्चिम बंगालमधील अलीपुरद्वार जिल्ह्यातील हासीमारा हवाई तळावर राफेल लढाऊ विमानांचे दुसरे स्क्वॉड्रन आहे. लालमोनिरहाट एअरबेस भारताच्या तोफखान्यांच्या रेंजमध्ये असला तरी, बांगलादेश आणि त्याचे मित्र देश चीन आणि पाकिस्तान सीमेजवळ असल्याने भारतीय सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा वापर करू शकतात.
