‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार असून मुंबईत एका महिन्याच्या आत सगळ्या मशिदींवरील भोंगे खाली आलेले असतील, असे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न सुरु केले असून लवकरच महाराष्ट्र भोंगा मुक्त होईल, असे सोमय्या यांनी म्हटले. यासह नांदेड मध्येही भोंगे विरोधी मोहीम सुरु करण्याची विनंती त्यांनी नांदेडच्या पोलीस अधिकाऱ्यांना केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील अनेक मशिदींच्या अनधिकृत भोंग्याविरोधात आवाज उठवून तक्रार दाखल त्यांनी ते खाली उतरवले आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी नांदेड पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मशिदींवरील भोंगे काढण्याची विनंती केली. ‘भोंगे मुक्त महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘भोंगे मुक्त महाराष्ट्र’ हा मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार आहे. घुसखोर बांगलादेशी मोहिमेनंतर हि मोहीम हाती घेतली आहे. मुंबईत एका महिन्याच्या आत सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असतील. आतापर्यंत ४० टक्के मशिदींनी भोंगे खाली उतरवले आहेत. नांदेड मध्येही हे अभियान जोरात सुरू करावे, अशी मी पोलीस अधिकाऱ्यांना विनंती केली आहे.
हे ही वाचा :
“पाक सध्या प्रोबेशनवर; वर्तन सुधारल्यास ठीक अन्यथा कठोर शिक्षा देणार!”
“भविष्यात ‘ऑपरेशन सिंदूर’चा अभ्यास लष्करी रणनीतीकार, विद्यार्थी करतील”
भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर इस्रायल खुश, दहशतवादविरुद्धच्या लढाईत पाठींबा!
कादंबऱ्या वाचणं कधीच सोडलंय, बालवाड्मय वाचायचं माझं वय नाही!
लवकरच नांदेड शहर आणि जिल्ह्यातील मशिदींवरील भोंगे हटविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गणपती उत्सवाच्या काळात आपले साऊंड सिस्टीम बंद करण्यात येतात मग त्यांचे भोंगे का बंद होत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
"नांदेड ही भोंगा मुक्त होणार"…..: किरीट सोमैया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार आहे ‘भोंगा मुक्त महाराष्ट्र’.
मुंबईत एका महिन्याच्या आत सगळ्या मशिदीवरील भोंगे खाली आलेले असतील. आतापर्यंत 40% मशिदींनी भोंगे उतरवले आहेत.
नांदेड मध्येही हे अभियान जोरात सुरू करावे,… pic.twitter.com/bBUdAyr8dX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 16, 2025
