‘नरकातला स्वर्ग’ नावाच्या पुस्तकात संजय राऊतांनी केलेल्या दाव्यावरून शिवसेना नेते संजय शिरसाट यांच्या टिकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. बालवाड्मय वाचायचं माझं वय नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह यांना शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली, असा दावा उबाठा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात केला आहे.
हे पुस्तक राऊतांच्या ईडी कोठडी आणि आर्थर रोड जेल कारावासातल्या एकूण अनुभवासंदर्भातील आहे. शनिवारी मुंबईत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, जावेद अख्तर, साकेत गोखलेसह आदी नेते प्रकाशन सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा :
‘पाकमधील दहशतवाद्यांचे तळ माहीत होते, पण राजकीय उदासिनतेमुळे कारवाई झाली नाही!’
“पाकचे दहशतवादाशी संबंध उघड झाल्यानंतर निधी देणं मोठी चूक”
पाकला भरणार धडकी; लष्करी ताकदीच्या बळकटीकरणासाठी ५० हजार कोटी
“इंडी आघाडीचे भविष्य उज्ज्वल दिसत नाही…” काँग्रेस नेते चिदंबरम असं का म्हणाले?
दरम्यान, पुस्तकातील दाव्यावरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देत टीका केली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. पुस्तकातील लिहिलेलं १०० टक्के सत्य आणखी काही लिहिले असते तर हाहाकार मजला असता असे संजय राऊत म्हणाले, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी कादंबऱ्या वाचणे कधीच सोडले आहे. कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेले नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या ते कोणी खूप मोठे नेते आहेत का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
