भारताने ज्या पद्धतीने पाकिस्तानवर जबरदस्त हल्ले केले आणि त्यामुळे पाकिस्तानची बोबडी वळली, त्यानंतर आता भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख बीएस धनोआ यांचे २०१९मधील एक भाषण व्हायरल होते आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यानंतरही हवाई दलाला कशी पाकिस्तानवर हल्ल्याची परवानगी नाकारण्यात आली, याबद्दलची नाराजी व्यक्त केली.
व्हीजेटीआयच्या एका कार्यक्रमात धनोआ यांनी हे वक्तव्य केले होते. आम्हाला माहीत होते की, पाकिस्तानात दहशतावाद्यांचे तळ कुठे आहेत. ते उद्ध्वस्त करण्यासाठी आम्ही सज्ज होतो. पण तेव्हा राजकीय निर्णयच झाला नाही. धनोआ हे २०१६ ते २०१९ भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते.
हे ही वाचा:
पाकला भरणार धडकी; लष्करी ताकदीच्या बळकटीकरणासाठी ५० हजार कोटी
ब्रह्मोससोबत हे ब्रह्मास्त्रही पाकिस्तानला हलाल करते आहे!
ट्रम्प यांचा ‘तो’ दावा एस जयशंकर यांनी फेटाळला
‘त्यांनी’ बीएसएफच्या जवानालाही सोडले नाही !
धनोआ त्या कार्यक्रमात म्हणाले की, २००१च्या डिसेंबरमध्ये भारताच्या संसदेवर हल्ला झाला. तेव्हादेखील पाकिस्तानवर हवाई हल्ले करून त्यांना दणका देऊया असा प्रस्ताव ठेवण्यात आला. पण तोदेखील स्वीकारण्यात आला नाही.
धनोआ यांनी सांगितले होते की, जर शांतता हवी आहे तर पाकिस्तानला ज्या सवलती मिळाल्या आहेत त्या बंद व्हायला हव्यात. भविष्यात भारताने छोटी, माफक युद्धे खेळली पाहिजे. शिवाय, पुढील काळात सगळी युद्धे ही जमीन, पाणी आणि हवेत होणार आहेत.
धनोआ यांचा हा दावा २०२५ला खरा ठरला. यावेळी भारताने पाकिस्तानला जेरीस आणताना तिन्ही दलांचा उत्तम समन्वय राखला आणि तिघांनीही एकत्रितरित्या पाकिस्तानला जेरीस आणले.
२६ फेब्रुवारी २०१९ला बालाकोट एअर स्ट्राइकबद्दल धनोआ म्हणाले की, पाकिस्तानवर या हल्ल्याचा चांगलाच परिणाम झाला. पाकिस्तानच्या हवाई दलाला तर या हल्ल्याविषयी काही माहितीच नव्हते. त्यांच्या संरक्षण दलांमध्ये समन्वयाचा अभाव होता आणि त्यांचा धीर खचला होता.
