30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
घरदेश दुनियाअहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

अहमदाबाद आणि सुरतेत धावणार मेट्रो

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारे अहमदाबाद मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे आणि सुरत येथील मेट्रोचे भूमिपूजन केले.

या मेट्रोंमुळे अहमदाबाद आणि सुरतमधील लोकांना सार्वजनिक वाहतूकीसाठी वेगवान पर्याय उपलब्ध होईल. या प्रसंगी बोलताना मोदी म्हणाले की हा या दोन शहरांसाठी महत्त्वाचा दिवस आहे.

ऑनलाईन माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे गव्हर्नर आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीप सिंग पूरी हे देखील उपस्थित होते.

पंतप्रधान भाषणात काय म्हणाले?

  • अहमदाबाद आणि सुरत या दोन्ही शहरांतील दळणवळण मेट्रोमुळे सुलभ होणार आहे. भारताकरता आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या शहरांना ही एक मोठी भेट मिळाली आहे.
  • दोन्ही शहरांना येणाऱ्या काळात या प्रकल्पांचा मोठा फायदा होणार आहे, हेच या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे.
  • आधीच्या सरकारांतील आणि या सरकारातील फरक स्पष्ट करण्यासाठी देशभरातील विविध मेट्रो प्रकल्प पुरेसे बोलके आहेत.
  • २०१४ पूर्वी देशात केवळ २२५ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे होते. परंतु आता देशभरात ४५० किमी लांबीचे मेट्रोचे जाळे आहे.
  • आज देशाच्या २७ शहरांत १००० किमी लांबीच्या मेट्रो मार्गांचे बांधकाम चालू आहे.
  • यापूर्वी सार्वजनिक वाहतूकींत ताळमेळ नव्हता. प्रत्येक शहराला स्वतंत्र मेट्रो प्रकल्प होते. मेट्रो पॉलिसी, आधुनिक योजना, देशाचा विकास असं नव्हतं.
  • परंतु आता आम्ही एकमेकांत ताळमेळ राखणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी करत आहोत.
  • बस, मेट्रो, रेल्वे यांचा एकमेकांत ताळमेळ साधलेला असल्याने ती एक व्यवस्था म्हणून कार्य करू शकेल.

अहमदाबाद मेट्रो रेल्वे प्रकल्प

अहमदाबाद मेट्रोचा दुसरा टप्पा २८.२५ किमी लांबीचा असेल. हा टप्पा दोन कॉरिडॉरमध्ये विभागलेला आहे. मोटेरा स्टेडियम ते महात्मा मंदिर या पहिल्या कॉरिडॉरची लांबी २२.८ किमी आहे. गुजरात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (जीएनएलयु) ते गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक (जीआयएफटी) हा दुसरा कॉरिडॉर ५.४ किमी लांबीचा आहे. या एकूण प्रकल्पाची किंमत ₹५,३८४ कोटी आहे.

सुरत मेट्रो प्रकल्प

सुरत मेट्रोची लांबी ४०.३५ किमी आहे. याचा पहिला कॉरिडॉर २१.६१ किमी लांबीचा आहे आणि तो सार्थाना ते ड्रीम सीटी असा आहे. तर १८.७४ किमी लांबीचा दुसरा कॉरिडॉर भेसाना ते सरोली असा आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹१२,०२० कोटी आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा