34 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरदेश दुनियापाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पदाचा दिला राजीनामा

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पदाचा दिला राजीनामा

झका अश्रफ यांनी अवघ्या ६ महिन्यांतच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

Google News Follow

Related

पाकिस्तान क्रिकेट बोर्डात (पीसीबी) सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे. एकीकडे संघाची कामगिरी बिघडली असून दुसरीकडे पीसीबीमध्ये राजीनामा सत्र सुरू आहे. २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीनंतर संघात आणि क्रिकेट बोर्डात अनेक बदल करण्यात आले. पण, आता अखेर बोर्डाच्या वरच्या स्तरावर मोठा बदल झाला आहे. झका अश्रफ यांनी अचानकपणे पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. झका अश्रफ यांनी अवघ्या ६ महिन्यांतच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

अलीकडेच, मिकी आर्थरसह सपोर्ट स्टाफच्या तीन सदस्यांनी राजीनामा दिला होता. आता झका अश्रफ यांनी पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने गोंधळ उडाला आहे. नजम सेठी यांना हटवल्यानंतर गेल्या वर्षी अश्रफ यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती.

झका अश्रफ यांनी सहा महिन्यांपूर्वी जूनमध्ये हे पद स्वीकारले होते. लाहोरमध्ये पीसीबीच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीनंतर झका अश्रफ यांनी अचानक राजीनामा जाहीर केला. पीसीबीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बैठकीच्या शेवटी, झका अश्रफ यांनी जाहीर केले की त्यांनी एमसीच्या अध्यक्ष आणि सदस्यपदाचा राजीनामा माननीय संरक्षक कार्यवाहक पंतप्रधान अन्वर-उल-हक कक्कर यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.”

वर्ल्ड कप २०२३ मध्ये पाकिस्तानी संघाच्या खराब कामगिरीनंतर बोर्डाने बाबर आझमला कर्णधारपदावरून हटवले, तर कोचिंग स्टाफ आणि निवड समितीमध्येही बदल करण्यात आला. मात्र, आता खुद्द झका अश्रफ यांनी खुर्ची सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच त्यांनी पीसीबीच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्समधील आपली जागाही सोडली आहे.

हे ही वाचा:

किशोरी पेडणेकर, रोहित पवारांना ईडीकडून समन्स

देशातील सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाचे पंतप्रधान मोदींकडून लोकार्पण; कसा आहे प्रकल्प?

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश म्हणाला, ‘माझा रामलल्ला विराजमान झाला’!

नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल, व्हिजनरी लीडर लाभला

२०११ ते २०१३ या काळात पीसीबीचे नेतृत्व करणाऱ्या झका अश्रफ यांना पाकिस्तानमध्ये सरकार बदलल्यानंतर नजम सेठी यांच्या जागी बोर्डाचे अध्यक्ष बनवण्यात आले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांना पीसीबीच्या व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदी राहण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा