क्विक कॉमर्स कंपनी झेप्टोला आर्थिक वर्ष २०२४–२५ मध्ये मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले आहे, तर त्याच वेळी कंपनीच्या विक्रीत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, झेप्टोने या वर्षी एकूण ९,६६८.८ कोटी रुपये विक्री नोंदवली असून ती मागील आर्थिक वर्ष २०२४ मधील ४,२२३.९ कोटी रुपये विक्रीपेक्षा सुमारे १२९ टक्के अधिक आहे. म्हणजेच ग्राहक आता पूर्वीपेक्षा खूप जास्त प्रमाणात जेप्टोवरून खरेदी करत आहेत.
मात्र विक्री वाढत असतानाच कंपनीचा तोटाही झपाट्याने वाढला आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जेप्टोला ३,३६७.३ कोटी रुपये इतका तोटा झाला आहे, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये हा तोटा १,२१४.७ कोटी रुपये होता. म्हणजेच कंपनीचा तोटा सुमारे १७७ टक्क्यांनी वाढला आहे. आपला व्यवसाय वाढवण्यासाठी जेप्टो मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. नवीन डार्क स्टोअर्स (लहान गोदामे), अतिजलद डिलिव्हरी व्यवस्था आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या सवलती व ऑफर्स दिल्या जात असल्यामुळे कंपनीचा खर्च प्रचंड वाढला असून त्यामुळे तोटा वाढत आहे.
हेही वाचा..
माउंट किलिमांजारोवर हेलिकॉप्टर अपघात
एसआयटीचा तमिळनाडूत छापा, व्यापारी संशयाच्या भोवऱ्यात
भारताच्या लॉजिस्टिक्स खर्चात होणार घट
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते वैभव सूर्यवंशीला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’
आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जेप्टोचा तोटा एकूण विक्रीच्या सुमारे ३५ टक्के इतका होता, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये हा आकडा सुमारे २९ टक्के होता. म्हणजे विक्री जितकी वाढते आहे, तितकाच खर्चही वाढत आहे. क्विक कॉमर्स कंपन्या एकूण विक्रीपैकी संपूर्ण रक्कम नफा म्हणून मोजत नाहीत. साधारणपणे केवळ १५ ते २० टक्के रक्कमच प्रत्यक्ष उत्पन्न (नेट रेव्हेन्यू) म्हणून धरली जाते. या हिशोबाने आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जेप्टोची प्रत्यक्ष कमाई सुमारे १,४९५ ते १,९९४ कोटी रुपये दरम्यान असल्याचा अंदाज आहे.
आर्थिक वर्ष २०२५ च्या उत्तरार्धात आणि आर्थिक वर्ष २०२६ च्या सुरुवातीला या क्षेत्रातील स्पर्धा आणखी तीव्र झाली आहे. सर्व मोठ्या कंपन्या नवीन स्टोअर्स उघडत आहेत, डिलिव्हरी वेगवान करत आहेत आणि जास्त सवलती देत आहेत. जेप्टोने ४५ कोटी डॉलर गुंतवणूक उभारल्यानंतर स्पर्धा आणखी वाढली असून इतर कंपन्यांनीही आपल्या योजना गतीमान केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते मागणी झपाट्याने वाढत असली तरी या टप्प्यात मार्जिनवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. हे सर्व अशा वेळी घडत आहे, जेव्हा जेप्टो शेअर बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. कंपनी २६ डिसेंबर रोजी आपल्या आयपीओसंबंधीचे ड्राफ्ट कागदपत्रे (डीआरएचपी) गुप्त पद्धतीने सादर करणार आहे. याचबरोबर कंपनीचे संस्थापक आदित पालिचा, कैवल्य वोहरा आणि मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) रमेश बाफना यांची कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.







