31 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरलाइफस्टाइलमुंबईच्या ८० वर्षांच्या खाद्यपरंपरेला अचानक ब्रेक

मुंबईच्या ८० वर्षांच्या खाद्यपरंपरेला अचानक ब्रेक

भोजनालय बंद होण्यामागचं नेमकं कारण काय?

Google News Follow

Related

मुंबईतील तब्बल ८० वर्षांची खाद्यपरंपरा जपणारे प्रसिद्ध श्री ठाकेर भोजनालय सध्या तात्पुरते बंद असल्याने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या कडक तपासणी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर हे भोजनालय अन्नसुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे बंद करण्यात आले का, असा सवाल उपस्थित झाला होता. मात्र, भोजनालय व्यवस्थापनाने या चर्चेला पूर्णविराम देत बंदचे खरे कारण स्पष्ट केले आहे.

१० ऑगस्टपासून भोजनालय तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून, स्वयंपाकघरातील दुरुस्ती, रंगकाम आणि आवश्यक अपग्रेडेशनची कामे सुरू असल्याचे व्यवस्थापनाने सांगितले आहे. अन्नसुरक्षा किंवा स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे प्रशासनाने कारवाई केल्याने भोजनालय बंद झालेले नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या बंदचा FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईशी थेट संबंध नसल्याचे समोर आले आहे.
हे ही वाचा:
आशिया कपआधी दीप्तीचा गेमप्लॅन तयार

भारताचा परकीय चलनसाठ्यात विक्रमी वाढ; ७०७ अब्ज डॉलरचा टप्पा पार

५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’!

मॉर्केलला टीम इंडियावर भरवसा नाय काय?

१९४५ मध्ये सुरू झालेले श्री ठाकेर भोजनालय मुंबईच्या खाद्यसंस्कृतीतील एक जुने आणि लोकप्रिय नाव आहे. गुजराती आणि राजस्थानी खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या या भोजनालयाची पारंपरिक थाळी विशेष लोकप्रिय आहे. गेल्या आठ दशकांत अनेक मुंबईकरांसोबतच सेलिब्रिटींनीही येथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र FDA कडून राज्यभरात अन्नसुरक्षेबाबत मोठी तपासणी मोहीम सुरू आहे. २५ मे ते ३१ जुलैदरम्यान तब्बल २८.६६ लाख किलो असुरक्षित खाद्यपदार्थ जप्त किंवा नष्ट करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ५५.७२ कोटी रुपये असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

त्यामुळे श्री ठाकेर भोजनालयाच्या बाबतीत सध्या सुरू असलेल्या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. FDA कारवाईमुळे नव्हे, तर स्वयंपाकघराच्या नियोजित दुरुस्ती आणि सुधारणा कामांमुळे भोजनालय तात्पुरते बंद आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा