28 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरधर्म संस्कृती'विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी उत्तम अधिवक्त्यांची नेमणूक करावी'

‘विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी उत्तम अधिवक्त्यांची नेमणूक करावी’

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

Google News Follow

Related

राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानभवनात वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना विशाळगड मुक्ती आंदोलन व हिंदू एकता आंदोलन यांच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी मा. उच्च न्यायालयाकडून मिळवलेली स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अधिवक्त्यांची नेमणूक करणे, तसेच विशाळगडावरील मंदिरे व योद्ध्यांच्या स्मारकांचा जिर्णोद्धार करणे बाबतचे निवेदन विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हिंदवी स्वराज्याचा वारसा आपल्याला अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी आहे, परंतु दुर्दैवाने महाराजांचा अमूल्य ठेवा असलेला विशाळगड अतिक्रमणामुळे अडचणीत आला आहे. विशाळगडाच्या मुक्तीसाठी हजारो शिवप्रेमी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. सदर प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यामुळे शासन स्तरावर अनेक गोष्टींसाठी बंधने आली आहेत. तरीही विशाळगड मुक्ती आंदोलन समितीची छत्रपती शिवाजी महाराजांवरती असलेली निष्ठा सोबतच आपणासारख्या कर्तृत्ववान व रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून सदर अतिक्रमणाबाबत सकारात्मक पावले उचलले जातील अशी अपेक्षा आहे. विशाळगड मुक्ती आंदोलनाने दिलेल्या निवेदनातील मागणीचा आपण अभ्यास करून विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्याच्या दृष्टीने उच्च न्यायालयात भक्कम बाजू मांडण्यासाठी चांगल्या अधिवक्त्याची नेमणूक करावी अशा आशयाचे पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना ताबडतोब पत्र दिले.

यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की, विशाळगडावरील 164 बांधकामे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण बेकायदेशीर ठरविले आहे. या बांधकामामध्ये राहण्याच्या सोयीसाठी खोल्या, मांस शिजवण्यासाठी खोल्या, या खोल्यांमध्ये जुगार व पत्ते खेळले जातात, या खोल्यांमध्ये दारू देखील प्राशन केली जाते. त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य नष्ट होत आहे. वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी सदरचे अतिक्रमण तोडण्यासाठी १ कोटी ३४ लाखांची तरतूद करून निधीही कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. परंतु यातील काही अतिक्रमण धारक कोर्टामध्ये गेल्यामुळे त्यांना उच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली आहे.

हे ही वाचा:

‘आम आदमी’ राजकुमार आनंद बसपातून भाजपात !

विशाळगडावरील मलिके रेहान दर्गा हटवा, नाहीतर…

मराठवाड्यासह विदर्भाला ४.२ रिश्टर स्केल भूकंपाचा बसला धक्का

मुस्लिमांना उमेदवारी आता विधानसभेत मविआच्या बोकांडी

प्रशासनाकडून वेळ काढूपणा, कोर्टात उपस्थित न राहणे अशा प्रकारचे प्रकार झाल्यामुळे स्थगिती उठवण्यासाठी वेळ लागत आहे. त्या अतिक्रमणधारकांना मिळालेली स्थगिती उठवण्यासाठी सरकारकडून चांगल्या वकिलाची नियुक्ती करण्यात यावी म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्या पद्धतीने सरकारच्या वतीने अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे झालेले अतिक्रमण बुलडोझर लावून जमीनदोस्त केले तशाच पद्धतीने विशाळगडावर झालेले देखील अतिक्रमण जमीनदोस्त करावे.

विशाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे व फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीची दुरावस्था झालेली आहे. त्या ठिकाणी बाजीप्रभू व फुलाजीप्रभूंच्या शौर्याचे शिवभक्तांना स्फूर्ती देणारे भव्य दिव्य स्मारक त्या ठिकाणी उभे करावे व किल्ल्यावर झालेली मंदिरांची व ऐतिहासिक वस्तूंची पडझड दुरुस्त करावी दुरुस्त करावी व मंदिरांचा जिर्णोद्धार करावा, अशी मागणी केल्याचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी सांगितले. यावेळी भाजपाचे आमदार संजय केळकर, मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील, चेतन भोसले, ओंकार पवार उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा