पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतदानाच्या दिवशी एका पोलिस अधिकाऱ्यावर मतदारांना विशिष्ट पक्षाला विशेषतः तृणमूल काँग्रेसला (TMC) मत देण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्या पोलिस अधिकाऱ्याला थेट जाब विचारत तीव्र विरोध दर्शवला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
घटनेनुसार, एका मतदान केंद्राबाहेर तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने काही मतदारांना तृणमूल कॉंग्रेसला मतदान करण्याचा सल्ला दिला. हे लक्षात येताच तेथील नागरिकांनी त्याला घेराव घालत, “तुम्ही सरकारी कर्मचारी असून अशा प्रकारे पक्षपाती भूमिका कशी घेऊ शकता?” असा सवाल केला. तसेच जरी या कर्मचाऱ्याने पोलिसांचा गणवेश परिधान केलेला असला तरी त्यावर नाव किंवा कर्मचारी क्रमांक असे काहीही नसल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांनी त्याच्या या वर्तनाला लोकशाही प्रक्रियेचा भंग असल्याचे सांगत निषेध नोंदवला.
या प्रकारानंतर वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. स्थानिकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली असून सोशल मीडियावरही संताप व्यक्त करण्यात येत आहे. तृणमूलकडून अद्याप या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
West Bengal's public confronted a cop for telling them to vote for TMC.
The change is loud and visible.
From silent voters to vocal warriors;
Bengali voters have come a really long way. pic.twitter.com/T912NnYnSZ— Rishi Bagree (@rishibagree) April 29, 2026
हे ही वाचा:
पश्चिम बंगालच्या फाल्टामध्ये इव्हीएममधील भाजपच्या बटणावर लावली टेप
जपानमध्ये प्रदर्शित होणार ‘धुरंधर’
पश्चिम बंगालच्या फाल्टा येथील संयुक्त ब्लॉक विकास अधिकाऱ्याची बदली
नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील निदा खानचे मालेगाव आणि मलेशियाशी संबंध
विशेष म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये यंदाच्या निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर मतदार सहभाग दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी बाहेर पडत लोकशाहीवरील विश्वास व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी पोलिस अधिकाऱ्याला जाब विचारणे हे बदलत्या जनमताचे आणि वाढत्या जागरूकतेचे प्रतीक मानले जात आहे.







