28 C
Mumbai
Sunday, June 26, 2022
घरधर्म संस्कृतीताजमहलबाबतची ‘ही’ तथ्ये दुर्लक्षिता येणार नाहीत...

ताजमहलबाबतची ‘ही’ तथ्ये दुर्लक्षिता येणार नाहीत…

Related

अप्रतिम सौंदर्यस्थळ म्हणून ज्या ताजमहालकडे जागतिक स्तरावर पाहिले जाते, ती वास्तू सध्या चर्चेत आली आहे ती या वास्तूतील २२ दरवाजे उघडण्याच्या मागणीमुळे. त्यातूनच या ताजमहलमध्ये नेमके काय आहे, त्याचा खरा इतिहास काय आहे, याविषयी उत्सुकता पुन्हा एकदा ताणली गेली आहे. पुरुषोत्तम नागेश ओक तथा पु. ना. ओक यांनी याच ताजमहलवर लिहिलेले ‘ताजमहल हिंदू राजभवन था’ हे पुस्तकही यानिमित्ताने चर्चेत आले आहे. त्यात केलेले अनेक दावे डोळे विस्फारायला लावणारे आहेत.

त्यात ओक यांनी काही छायाचित्रांबाबतचा उल्लेख करून वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

महल कुठला?

त्यात म्हटले आहे की, कुठल्याही मुस्लिम इमारत किंवा वास्तूला महल म्हटले जात नाही. कारण हा शब्द हिंदी आहे. ज्या देशातून मुघल आले तिथे कधीही कुठला महल नव्हता. मग त्यांना महाल बनविण्याचे तंत्र कुठून ठाऊक असणार.

या पुस्तकात असा दावा करण्यात आला आहे की, या पुस्तकात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे ताजमहलमधील पुरावे लपविण्यासाठी अनेक दरवाजे विटांनी बंद करण्यात आले. मकबऱ्यात अशा गुप्त खोल्या बनविण्याची गरज काय होती?

या भिंतींमुळे अन्य खोल्यांशी संपर्क तुटला आहे. तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याद्वारे खोल्यांमधला तो संबंध राहू नये यासाठीच या भिंती उभारल्या गेल्या अशी शंकाही उपस्थित केली गेली आहे.

विहीर कुठून आली?

ताजमहलच्या तळमजल्याला संगमरवराचा वापर करून बनविण्यात आलेल्या अनेक खोल्या आहेत. त्यावरून हा महाल होता हे सिद्ध होत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. एखाद्या थडग्याच्या ठिकाणी अशा खोल्या करण्याची गरज काय होती? त्या ठिकाणी एक खोल विहीरही दिसते. मकबऱ्यात अशा विहिरीची गरज नसते, मग ती का बांधण्यात आली, असा सवाल या पुस्तकात उपस्थित करण्यात आला आहे. विहीर आहे याचा अर्थ या महालात राहणाऱ्यांसाठी पाण्याचा प्रबंध करण्यात आला असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

फुलांची कहाणी

ताजमहलच्या भिंतींवर फुले चितारण्यात आली असून त्यात ओमचा आकार लपल्याचा दावा करण्यात आला आहे. कोणत्याही मुस्लिम वास्तुनिर्मात्याकडून ओमचे चिन्ह कधीही वापरले जात नाही, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. प्रवेश द्वारावर कमळाचे फूल चितारण्यात आले आहे. मुस्लिम धर्मात कमळाच्या फुलाचा संबंध काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

त्याचवेळेला ताजमहलमध्ये लांब अशी मार्गिका दिसते तशा मार्गिका मकबऱ्यात काय गरजेच्या आहेत असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.

ताजमहलच्या मागील बाजूस असलेल्या खिडक्यांच्या बाबतीतही सवाल उपस्थित केला आहे. कबरीत अशा खिडक्यांची काय आवश्यकता असा प्रश्नही विचारण्यात आला आहे. उलट अशा मोठ्या खिडक्या या महालातच असू शकतात.

ओक यांनी म्हटले आहे की, ताजमहल ही वास्तू मुमताजचा मकबरा नव्हता तर ते प्राचीन हिंदू शिवमंदिर आहे आणि त्याला तेजोमहालय म्हटले जात होते. ओक यांनी म्हटले आहे की, हे शिवमंदिर शहाजहाँने जयपूरचे महाराज जयसिंह यांच्याकडून अवैध मार्गाने घेतले होते. त्यानंतर त्यावर कब्जा घेतला. मकबऱ्याजवळ एक संगीतालय होते. कुठल्याही कबरीजवळ संगीतालयाची काय आवश्यकता होती?

हे ही वाचा:

थॉमस कप जिंकत भारताने रचला इतिहास

‘लोकायुक्त कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा’

उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा विसर

‘तुम्ही वैयक्तिक टीका करता, आम्ही म्याव म्याव केलं तर चालत नाही?’

 

या पुस्तकात काही परदेशी इतिहासतज्ज्ञांचे दाखले देण्यात आले आहेत, ते असे-

पीटर मुंडी यांनी म्हटले होते की, ताजमहल हा मुगल बादशहाच्या आधीपासूनच बांधलेला होता. कारण मुमताजचा मृत्यू १६३१ला झाला तेव्हा मुंडी भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी ते लिहून ठेवले होते. न्यूयॉर्कचे पुरातत्व विभागाचे प्रमुख मर्विन मिलर यांनी ताजमहालाच्या दरवाजाच्या लाकडावरून १९८५मध्ये हे सिद्ध केले की, हा ताजमहाल ३०० वर्षे जुना आहे. १३५९मधील हा दरवाजा असावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

युरोपियन यात्रेकरू जॉन अल्बर्ट मॅनडेलस्लो यांनी १६३८मध्ये आगरा भ्रमण केले. मुमताजच्या मृत्यूनंतर सात वर्षांनी ते आले होते. तेव्हा त्यांनी ताजमहल मुमताजच्या मृत्यूनंतर बांधण्यात आल्याचा कुठलाही दाखला दिलेला नाही. पण जे ताजमहल मुमताजच्या स्मरणार्थ बांधण्यात आला असे म्हणतात त्यांच्या मते १६३१ ते १६५१ या कालावधीत ताजमहल बांधण्यात आला.

एवढेच नव्हे तर शहाजहाँचा दरबारी लेखक मुल्ला अब्दुल हमीद लाहौरी याने बादशहानामा या १००० पानी वृत्तांतामध्ये पृष्ठ क्र. ४०२, ४०३ वर नमूद केले होते की, मुमताजला बुऱ्हाणपूरला दफन केले होते. नंतर तिचे शव अकबराबाद आगराला आणण्यात आले.

शिवाय, जयपूर महाराजांच्या गुप्त संग्रहात असे दोन आदेश आहेत ज्यात शहाजहाँने ताजभवन समर्पित करण्यासाठी जयसिंह यांना सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
10,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा