32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरधर्म संस्कृतीबर्लिन, हाँगकाँग, अमेरिकेत गणपतीचे स्वागत होणार ढोल ताशांच्या गजरात!

बर्लिन, हाँगकाँग, अमेरिकेत गणपतीचे स्वागत होणार ढोल ताशांच्या गजरात!

Google News Follow

Related

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आलेला असताना बाप्पाच्या स्वागतासाठी अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग, नेदरलँड, फ्रान्स, लक्समबर्ग, बेल्जियम आदी देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांचीही लगबग सुरू झाली आहे. जर्मनीमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांनी महिला पथकासाठी यंदा महाराष्ट्रातून लेझीम मागवल्या आहेत. लेझीमच्या जोडीने बर्लिनमध्ये मिरवणूक काढून गणरायाची प्रतिष्ठापना करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. हाँगकाँगमधील भाविकांनी पुण्याहून बाप्पासाठी मोदक मागवले आहेत.

बर्लिन शहरात ‘मराठी मित्र बर्लिन’ यावर्षी बाप्पाची मिरवणूक काढून ढोल आणि लेझीम पथकाच्या सहाय्याने बाप्पाचे स्वागत करणार आहे. २०१८ पासून त्यांच्याकडे ढोल पथक असले तरी यंदाच्या वर्षी त्यांनी महिलांच्या लेझीम पथकाचा समावेश केला आहे. मिरवणुकीसाठी ते गेल्या तीन महिन्यांपासून दर शनिवार आणि रविवार सराव करत आहेत. मिरवणुकीसाठी लागणारे ढोल, लेझीम त्यांनी महाराष्ट्रातून मागवले आहे. मिरवणुकीतील पालखी त्यांनी बर्लिनमध्येच तयार केली आहे. पथकात सहभाग घेणारे नागरिक हे केवळ बर्लिन शहरातलेच नसून शेजारील शहरातील आणि नेदरलँड, फ्रान्स, लक्समबर्ग, बेल्जियम आदी देशातलेसुद्धा आहेत. गणरायाची मिरवणूक ही बर्लिनमधल्या एका प्रमुख रस्त्यावरून निघणार आहे.

हे ही वाचा:

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

अमेरिकेतील उत्तर कॅरोलिन राज्यातील रॉली या शहरातही गणरायाचे आगमन हे ढोल ताशांनी केले जाणार आहे. गणपतीसाठी जास्वंदाची फुले असावी म्हणून उन्हाळ्यातच ती झाडे लावण्यात आली आहेत. ढोल पथकांचा सराव सुरू झाला आहे. पथकातील सर्वांचे लसीचे दोन डोसही झालेले आहेत. तिथल्या इंडियन स्टोअरमध्ये गणपतीची मूर्ती, पूजेचे साहित्य, नारळ, धूप, अगरबत्ती असे सर्व मिळते. सजावट इकोफ्रेंडली असावी यासाठी अमेरिकेत विशेष प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्र मंडळात गणपतीच्या १० दिवसांसाठी स्पर्धांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

हाँगकाँगमध्ये जुलै महिन्यापासून गणपतीची तयारी सुरू आहे. तिथे जुलै महिन्यात सुट्ट्या असल्यामुळे त्या काळात तिथली मुले काही सादरीकरणाची आणि सजावटीची तयारी करतात. मंदिरात बाप्पाची मूर्ती बसवून १० दिवस नैवेद्य आणि आरती केली जाते. यंदा त्यांनी पुण्याहून मोदकही मागवले आहेत. मराठी बर्लिन मित्र हे मराठी भाषा आणि संस्कृतीबद्दल प्रेम असणाऱ्यांसाठी खास आहे. विविध ठिकाणचे लोक असले तरीही कोणीही सराव चुकवत नाहीत.

बर्लिन शहर प्रशासन आणि गणेश मंदिराने केलेले सहकार्य हे कौतुकास्पद आहे त्यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा करणे शक्य असल्याचे बर्लिनमधील रहिवासी सानिका बर्वे यांनी सांगितले. आमची जन्मभूमी भारत आहे आणि कर्मभूमी अमेरिका आहे. मात्र बाप्पा कायम हृदयात आहे. सातासमुद्रापार असलो तरीही उत्साह तितकाच आहे. गणपतीच्या आगमनाची उत्सुकता आहे, अमेरिकेच्या रहिवासी जाई पवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा