34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरधर्म संस्कृतीकुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा

कुर्ल्यात साजरा होतोय डिजिटल गुढी पाडवा

Google News Follow

Related

गुढी पाडवा अर्थात हिंदू नववर्षाचे स्वागत समस्त हिंदू समाजाकडून अतिशय उत्साहात केले जाते. राज्यात ठिकठिकाणी स्वागत यात्रा निघत असतात पण गेल्या दोन वर्षात देशावर कोरोनाचे सावट असल्यामुळे हे सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले. पण याही परिस्थितीत कुर्ल्यातील स्वागत यात्रा समितीने एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांनी नागरिकांना आवाहन करत डिजिटल गुढी पाडवा साजरा करण्याचे ठरवले आहे. समितीच्या या उपक्रमाला नागरिकांनीही उदंड प्रतिसाद दिला आहे.

डिजिटल नववर्ष स्वागतयात्रेअंतर्गत समस्त कुर्लेकरांना एक व्हाट्सअप क्रमांक (9392400070) देण्यात आला आहे. ज्याद्वारे सर्व कुर्लेकर जोडले गेले आहेत. कुर्लावासीयांनी आपल्या घरी पारंपारिक वेशात गुढी, धर्मध्वजाचे पूजन करावे आणि ते फोटो व्हाॅट्सअपच्या माध्यमातून समितीकडे पाठवावे असे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला कुर्ल्यातील नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या फोटोंना फेसबुक, ट्विटर तसेच इन्स्टाग्रामवर प्रसिद्धी देण्यात येत आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या अकार्क्षमतेमुळे वसई- विरारमध्ये रुग्णांचा मृत्यु

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा

नंदुरबारमध्ये रुग्णांसाठी रेल्वेचा मदतीचा हात

महाराष्ट्रात कोविड रुग्णांमध्ये घट

कुर्ल्यातील भारत नाका परिसरात सामूहिक गुढी उभारण्यात आली आहे. हा सर्व परिसर भगव्या पताकांनी  सजवण्यांत आला आहे. देशभरातील विविध प्रांतात नवीन वर्ष कशाप्रकारे साजरे केले जाते याचा देखावा भारत नाका परिसरात उभारण्यात आला आहे. आज गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत हा देखावा नागरिकांना पाहण्यासाठी खूला असणार आहे. कुर्लेकरांनी गर्दी न करता हा देखावा पहावा असे आवाहन नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे सांगण्यात आले आहे. दरवर्षी कुर्ल्यातील नववर्ष यात्रेची सांगता जागृत विनायक मंदीर येथील महाआरती ने होत असते. पण कोरोनाच्या निर्बंधामुळे भाविकांसाठी ही महाआरती फेसबूकवर लाईव्ह करण्यात आली. स्वागत यात्रेच्या पेजवर नागरिकांनी या लाईव्ह आरतीचा लाभ घेतला. सर्व नागरिकांनी डिजिटल माध्यमातून या उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे व कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी गणराया चरणी प्रार्थना करावी असे आवाहन नववर्ष यात्रा समितीकडून करण्यात आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा