26 C
Mumbai
Tuesday, December 10, 2024
घरधर्म संस्कृतीअफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह

अफजलखान वध म्हणजेच शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने साजरा होणार शिवप्रताप सप्ताह

शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र व देशभरात केला जाणार जागर

Google News Follow

Related

स्वराज्यावर आक्रमण करून रयतेला त्राही त्राही करणाऱ्या धर्मांध अफजलखानाचा वध करून शिवरायांनी देदीप्यमान इतिहास घडविला. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण म्हणजेच शिवप्रताप दिन होय. यानिमित्त शिवशंभू विचार मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशभरात १० ते १७ नोव्हेंबर २०२४ या दरम्यान शिवप्रताप सप्ताह साजरा होणार आहे.

शंभू महादेवाच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घेऊन शेकडो वर्षांच्या गुलामीतून हिंदु समाज, राष्ट्र आणि संस्कृती मुक्त करण्याचा संकल्प शिवरायांनी सोडला. आदिलशाहीचा तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले व कोंढाणा, पुरंदर, राजगड, रोहिडा घेऊन स्वराज्य विस्ताराला सुरुवात केली.

आदिलशहाने स्वराज्यावरच्या पहिल्या आक्रमणास सरदार फत्तेखानाला पाठविले. पुरंदरावर शिवरायांनी त्याला धूळ चारली. त्यामुळे चवताळलेल्या आदिलशहाने आपला सर्वात बलाढ्य सरदार अफजलखानास प्रचंड फौजेसह शिवरायांवर आक्रमण करण्यास पाठविले. ‘चालत्या घोड्यानिशी काफर शिवाला जिंदा या मुर्दा आणतो’ अशी प्रतिज्ञा करून अफजलखान निघाला.

हे ही वाचा:

मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या जिम्नॅस्ट्सचे निर्विवाद वर्चस्व !

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा!

करण ठाकूर ठरला जिल्हास्तरीय ‘मावळी मंडळ श्री’चा मानकरी

सुन लो ओवैसी…संभाजीनगरचे नाव औरंगाबाद करणारा अजून जन्माला यायचा आहे!

शहाजीराजांना विश्वासघाताने कैद करणारा आणि शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजांची हत्या घडविणारा अफजलखान धर्मांध आणि विश्वासघातकी होता. स्वत:ला मंदिरे आणि मूर्तींचा विध्वंस करण्यात धन्य मानणाऱ्या अफजलखानाला धडा शिकविण्याचा निर्धार शिवरायांनी केला. प्रतापगडावरील भेटीच्या प्रसंगी शिवरायांचा गळा आवळून पाठीवर शस्त्र चालविणाऱ्या अफजलखानाचा वध करून शिवरायांनी पराक्रमाची शर्थ केली. या पराक्रमाने शिवरायांची कीर्ती जगभरात पसरली. म्हणूनच आपण १० नोव्हेंबर १६५९ हा दिवस दरवर्षी शिवप्रताप दिन म्हणून साजरा करत असतो.

शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेल्या प्रतापगडावर परकीय इंग्रजांनी जाणीवपूर्वक राष्ट्र आणि समाजद्रोही अफजलखानाच्या थडग्याचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतरही अनेक दशके या थडग्याचे अवडंबर वाढतच गेले. वर्तमान सरकारने नुकतेच त्या थडग्यावरील बेकायदेशीर बांधकाम हटवून शिवभक्तांना न्याय दिला.

शिवरायांच्या या पराक्रमाचे स्मरण करण्यासाठी श्रीशिवशंभू विचार मंच महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांवर आणि प्रत्येक तालुक्यात शिवप्रताप सप्ताह साजरा करणार आहे. जलदुर्ग, गडकोट किल्ल्यांवर देवदेवतांना अभिषेक करून पूजन करण्यात येणार आहे. गावोगावी व्याख्याने, मर्दानी खेळ, किल्ल्यांच्या स्पर्धांचे, शाहिरी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व तीर्थक्षेत्रे व गावोगावच्या मंदिरांमधून शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन करून देवतांना अभिषेक केला जाणार आहे.

देशात जिथे जिथे मराठी राज्याचा विस्तार झाला होता तिथे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. दिल्ली, पानिपत, इंदोर, उज्जैन, ग्वाल्हेर, झाशी, देवास, धार, जबलपूर, बडोदा, सुरत, तंजावूर, श्रीशैलम, बेळगाव, कारवार, धारवाड, गोवा या सर्व ठिकाणी हा विजयोत्सव साजरा होणार आहे.

शिवचरित्र आणि मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना निर्माण करणे, गडकोटांच्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन करणे, गडकोटांवरील पावित्र्य जपणे व स्वच्छता अभियान राबविणे, अतिक्रमणांविरूद्ध जागृती निर्माण करणे असे विविध प्रकारचे उपक्रम श्रीशिवशंभू विचार मंच गेली अनेक वर्षे राबवित आहे.

शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत पुढीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ऐतिहासिक घराण्यांचे वंशज व माजी सेनाधिकारी यांच्या हस्ते वेगवेगळ्या ठिकाणी पूजन होणार आहे. ग्रामदैवत कसबा गणपतीला अभिषेक करून लाल महालात पूजन करून प्रारंभ होणार आहे. शिवाजीनगर, कोथरूड, पुणे लष्कर, भारती विद्यापीठ, थेरगाव येथील शिवस्मारके तसेच डेक्कन जिमखाना व कात्रज तलाव येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकांचे पूजन होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
211,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा