28 C
Mumbai
Sunday, December 8, 2024
घरविशेषमुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या जिम्नॅस्ट्सचे निर्विवाद वर्चस्व !

मुलींच्या वरिष्ठ गटात छत्रपती संभाजीनगर साईच्या जिम्नॅस्ट्सचे निर्विवाद वर्चस्व !

आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा

Google News Follow

Related

मुलींच्या वरिष्ठ गटातील स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर साई केंद्राच्या सिद्धी हत्तेकरने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण सर्वोत्कृष्ट जिम्नॅस्टचा किताब मिळवत सुवर्णपदक पटकावले. मुंबई उपनगरची अनुष्का पाटील हिला रौप्य तर पुण्याच्या सताक्षी टक्के हीने कांस्यपदक पटकावले.

छत्रपती संभाजीनगर साई केंद्राच्या सिद्धी हत्तेकरने हिने निर्विवाद वर्चस्व गाजवत टेबल व्हाॅल्ट या प्रकारात सुवर्ण तर अनव्हन बार्स व फ्लोअर एक्सरसाईज प्रकारात रौप्य पदक मिळवले. मुंबई उपनगरच्या अनुष्का पाटील हिने टेबल व्हॉल्ट प्रकारात रौप्य व बॅलसिंग बीम यात सुवर्ण पदक पटकावले. तिच्या पाठोपाठ पुण्याच्या शताक्षी टक्के हिने बॅलसिंग बीमवर रौप्य व फ्लोअर एक्सरसाईजवर कांस्य पदक पटकवले.

साई छत्रपती संभाजीनगरच्या रिद्धी हत्तेकर हिने फ्लोअर एक्सरसाईजवर सुवर्ण व टेबल व्हाॅल्ट या प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. या सर्वांमध्ये मुंबई उपनगरच्या इशिता रेवाळे हिने अनइव्हन बार्सवर सादरीकरणात जास्त गुण घेऊन सुवर्णपदक पटकावले.

पुरुषांच्या वरिष्ठ गटातील स्पर्धा उशिरापर्यंत सुरू होत्या. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संघटनेचे सचिव डॉ. मकरंद जोशी तांत्रिक समिती प्रमुख प्रवीण ढगे स्पर्धा प्रमुख डॉ. विशाल देशपांडे छत्रपती पुरस्करार्थी रणजीत पवार, डॉ. सागर कुलकर्णी, औरंगाबाद जिल्हा जिम्नास्टिक संघटनेचे सचिव हर्षल मोगरे, यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा

‘अतुल भातखळकरांच्या लोकप्रियतेत सतत वाढ, रेकॉर्ड मार्जिनने होणार विजय’

मॉब लिंचिंग झाले नसल्याच्या दाव्यानंतर आदित्य ठाकरेंवर समाजमाध्यमात टीकेचा भडीमार

कॅनडातील हिंदू मंदिर हल्ल्याप्रकरणी चौथ्या आरोपीला अटक!

स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे :
वरिष्ठ महिला गट

सर्वसाधारण विजेतेपद

प्रथम – सिद्धी हत्तेकर (साई छत्रपती संभाजीनगर ) 40.85 गुण
द्वितीय – अनुष्का पाटील (मुंबई उपनगर ) 40.70 गुण
तृतीय – शताक्षी टक्के ( पुणे ) 39.30 गुण

टेबल व्हाॅल्ट

प्रथम – सिद्धी हत्तेकर ( साई छत्रपती संभाजीनगर) 11.40 गुण
द्वितीय- अनुष्का पाटील( मुंबई उपनगर) – 11.28 गुण
तृतीय- रिद्धी हत्तेकर ( साई छत्रपती संभाजीनगर ) 11.05 गुण

अनइव्हन बार्स

प्रथम- इशिता रेवाळे ( मुंबई उपनगर) 9.30 गुण
द्वितीय- सिद्धी हत्तेकर (साई छत्रपती संभाजीनगर ) 9.30 गुण
तृतीय – रिद्धी हत्तेकर ( साई छत्रपती संभाजीनगर) 9.20 गुण

बॅलन्सिंग बीम

प्रथम- अनुष्का पाटील (मुंबई उपनगर) 9.85 गुण
द्वितीय -शताक्षी टक्के (पुणे) 9.20 गुण
तृतीय – सिद्धी हत्तेकर (साई छत्रपती संभाजीनगर) 9.10 गुण

फ्लोअर एक्सरसाइज

प्रथम – रिद्धी हत्तेकर (साई छत्रपती संभाजीनगर) 10.94 गुण
द्वितीय- सिद्धी हत्तेकर ( साई छत्रपती संभाजीनगर) 10.85 गुण
तृतीय- शताक्षी टक्के (पुणे) 10.80 गुण

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
210,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा