31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
घरधर्म संस्कृतीदेशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’

देशभरात रामनवमीच्या शोभायात्रांना केले ‘लक्ष्य’

जाळपोळ, दगडफेक, पोलिसांवर हल्ले यांची पुनरावृत्ती, अनेकांना अटक

Google News Follow

Related

हिंदू सणांना लक्ष्य करणे, त्यावेळी दगडफेक करून वातावरण बिघडविणे, वाहनांची जाळपोळ करणे, पोलिसांवर हल्ले करणे हे प्रकार थांबण्याची चिन्हे नाहीत. यावेळीही रामनवमीच्या शोभायात्रा, मिरवणुकीदरम्यान संपूर्ण देशभरात या प्रकारांनी वातावरण तापले. या सगळ्या निंदनीय प्रकारातून दोन जणांचा बळी गेला. त्यातील एक मृत्यू महाराष्ट्रात तर दुसरा बळी पश्चिम बंगालमध्ये गेला.

या शोभायात्रांदरम्यान दगडफेक, जाळपोळ, घोषणाबाजी, पोलिसांवर हल्ले अशा प्रकारांनी गालबोट लागले. अनेक ठिकाणी शांतता राखण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी नव्याने काही ठिकाणी तणावपूर्ण स्थिती पुन्हा निर्माण झाली.
महाराष्ट्रासह, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात कर्नाटक, उत्तर प्रदेश याठिकाणी शोभायात्रांवेळी हाणामाऱ्या, दगडफेकीतून वातावरण पेटले.

महाराष्ट्रात तीन ठिकाणी तणाव

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, मुंबईतील मालाड आणि जळगाव जिल्ह्यात हे प्रकार घडले. संभाजीनगर येथे किराडपुऱ्यात रामनवमीच्या आदल्या दिवशी राम मंदिराबाहेर दगडफेक केली गेली आणि त्यातून मग १३ गाड्या जाळण्यात आल्या. त्यात पोलिसांच्या तसेच खासगी गाड्यांचा समावेश होता. अनेक पोलिस जखमी झाले. तुफान दगडफेक करण्यात आली. याचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागले असून त्यात पोलिसांच्या गाड्यांवर कसे हल्ले केले गेले, कशी दगडफेक केली गेली, पेट्रोलच्या बाटल्या फेकण्यात आल्या, एकाचवेळी ४०० ते ५००चा जमाव कसा जमा झाला, हे कुणी कारस्थान केले, आधीपासूनच दंग्याचे हे नियोजन केले गेले होते का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. या दगडफेकीत ५१ वर्षीय व्यक्तीचे निधन झाले. त्याच्या डोक्याला मार बसला होता आणि त्याला रुग्णालयात दाखल केल्यावर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेख मुनिरुद्दीन असे त्याचे नाव असल्याचे कळते. या सगळ्या दंग्यात १० पोलिसांसह १२ लोक जखमी झाले आहेत.
मालवणी, मालाड येथे शोभायात्रेदरम्यान दोन गटात तणाव निर्माण झाला. या शोभायात्रेत मोठ्याने डीजे लावल्यामुळे वाद झाल्याचे बोलले जात आहे. त्यात आता २० लोकांना अटक झाली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
मुंबई पोलिसांचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनीही घटनास्थळी जाऊन परिस्थिती आणखी चिघळण्यापासून रोखली.
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे रात्री पोलीस ठाण्यात आले.
जळगावमध्येही अशाच घटनेमुळे वातावरण तापले. दोन गटात झालेल्या हाणामारीत ४ जण जखमी झाले. मशिदीत नमाझ सुरू असताना बाहेर रामनवमीच्या मिरवणुकीत लावलेल्या गाण्यांवरून ही हाणामारी झाली. या विभागात चाललेल्या पालखीवर काही लोकांनी दगडफेक केली. आतापर्यंत ४५ जणांना या भागातून अटक करण्यात आले असून दोन एफआयआर नोंदविण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

इंदूरची ती विहीर खुनी की अनधिकृत बांधकाम जीवघेणे

घर खरेदी करा जुन्या रेडीरेकनर दरानेच

मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळला

पोलिसांनी शक्कल लढवून योगेश मोगरेंच्या हत्येतला मारेकरी पकडला

पश्चिम बंगालमध्ये हल्ले

हिंदू सणांच्या मिरवणुका, शोभायात्रांमध्ये गोंधळ माजविण्याचे प्रकार पश्चिम बंगालमध्ये नवे नाहीत. हावडा आणि दालखोला या भागात अशा घटना घडल्या. रामनवमी साजरी करताना हावडामध्ये अनेक गाड्यांना आगी लावण्यात आल्या. रामनवमीच्या मिरवणुकांवर अनेकांनी हल्ला करून त्यावर काचेच्या बाटल्या फेकून, दगड विटांचा मारा केला. काझीपाडा आणि शिवपूर येथे गाड्यांना आगी लावण्याच्या घटना घडल्या. दालखोला येथे एका माणसाची हत्या झाली. तिथेही दोन गटात दंगल उसळली. त्यात पाच ते सहा पोलिस जखमी झाले.

गुजरातमध्येही दगडफेक

गुजरातमध्ये वडोदरा येथील फतेहपुरा याठिकाणी दोन गटात दगडफेक झाली आणि अनेक गाड्यांना आगी लावण्यात आल्या.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा