36 C
Mumbai
Thursday, February 29, 2024
घरधर्म संस्कृती“आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण २२ जानेवारीला अनुभवणार”

“आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण २२ जानेवारीला अनुभवणार”

राम मंदिर सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळताच क्रिकेटपटू भावूक

Google News Follow

Related

अयोध्येत राम मंदिरातील राम मूर्तीचा न भुतो न भविष्यती असा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी या दिवशी पार पडणार आहे. संपूर्ण देशात यानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे. या दिवशी देशात दिवाळी साजरी केली जावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलं आहे. शिवाय या भव्य सोहळ्याचं निमंत्रणही विविध दिग्गजांना पाठविण्यात येत आहे.

राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण एका भारतीय क्रिकेटपटूलाही देण्यात आलं आहे. यानंतर या खेळाडूने एक भावनिक पोस्ट लिहित आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. व्यंकटेश प्रसाद असं या खेळाडूचं नाव आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन व्यंकटेश प्रसादने राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं निमंत्रण मिळाल्याचं म्हटलं असून त्याने यासंदर्भात एक भावूक पोस्टही लिहिली आहे.

“मी हयात असेपर्यंत राम मंदिराची निर्मिती आणि त्यात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व्हावी अशी माझी अपेक्षा आणि इच्छा होती. राम मंदिर बांधलं गेलं आणि २२ जानेवारी या दिवशी उद्घाटन सोहळा आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं निमंत्रण मला मिळालं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. या निमंत्रणासाठी मी आभार व्यक्त करतो.” असं म्हणत व्यंकटेश प्रसादने X या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. मी माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण २२ जानेवारीला अनुभवणार आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच निमंत्रण मिळाल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. या पोस्टची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

हे ही वाचा:

रामनगरी होणार अर्थव्यवस्थेचे प्रमुख केंद्र

अदानींना ‘सर्वोच्च’ दिलासा; हिंडेनबर्ग प्रकरणचा तपास सेबीकडेच

ओवैसी यांच्या भडकवणाऱ्या वक्तव्याचा भाजपा नेत्याकडून समाचार

बैरूतमध्ये स्फोट घडवून हमासच्या उपप्रमुखाला उडवले!

क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसाद हे भारतीय संघात गोलंदाज होते. २००७ मध्ये झालेल्या टी- २० वर्ल्ड कप विजेत्या संघाचे ते बॉलिंग कोचही होते. व्यंकटेश प्रसाद यांनी त्यांच्या कारकिर्दीत ३३ कसोटी सामन्यांमध्ये ९६ विकेट घेतल्या आहेत. तर १६१ वन डे सामन्यांमध्ये १९६ विकेट घेतल्या आहेत. आता राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मिळाल्यानंतर व्यंकटेश प्रसाद भावूक झाल्याचं त्यांच्या पोस्टवरुनच कळतं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
132,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा