29 C
Mumbai
Monday, October 5, 2026
घरलाइफस्टाइल‘जो वापस न लौटे, मिट्टी के बेटे’

‘जो वापस न लौटे, मिट्टी के बेटे’

Google News Follow

Related

सध्या सगळीकडे बॉर्डर-२चीच चर्चा सुरू आहे. गाणी लागोपाठ लोकांच्या मनाला भिडतायत. ‘जाते हुए लम्हों’चं वेड अजून ओसरलेलं नाही, तोच आता चित्रपटातून नवं देशभक्तीपर गाणं ‘मातीचे पुत्र’ समोर आलंय.

हे गाणं ऐकताना डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत. देशासाठी हसत-हसत प्राण देणाऱ्या जवानांच्या भावना या गाण्यात खूप साध्या पण प्रभावी शब्दांत मांडल्या आहेत. सध्या गाण्याचं फक्त ऑडिओ प्रसिद्ध झालं असून, लवकरच त्याचा व्हिडिओही येणार आहे.

हे गाणं गायलंय सोनू निगम यांनी, संगीत दिलंय मिथुन यांनी आणि शब्द लिहिलेत मनोज मुंतशिर यांनी. गाणं रिलीज होताच चाहत्यांनी भरभरून दाद दिली आहे. अनेकांनी समाजमाध्यमांवर भावना व्यक्त करत, “हे गाणं थेट मनाला भिडतं” असं म्हटलं आहे.

आत्तापर्यंत बॉर्डर-२मधली चारही गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. प्रत्येक गाणं देशप्रेम जागवणारं आहे.

या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. २३ जानेवारी रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार असून, पहिल्या बॉर्डरपेक्षाही दमदार अनुभव देईल, अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा