27 C
Mumbai
Sunday, January 25, 2026
घरराजकारणभाजपशी युती केल्याने निलंबित केलेल्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’

भाजपशी युती केल्याने निलंबित केलेल्या १२ काँग्रेस नगरसेवकांनी हाती घेतले ‘कमळ’

अंबरनाथ नगरपरिषदेतील १२ नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांना पक्षाने केले होते निलंबित

Google News Follow

Related

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर अंबरनाथ नगरपरिषदेतील १२ नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेवकांना पक्षाने निलंबित केल्याचे समोर आले आहे. भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल पक्षाने ही निलंबनाची कारवाई केली आहे. यानंतर नवनिर्वाचित नगरसेवक हे औपचारिकपणे भाजपामध्ये सामील झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या घडामोडीला दुजोरा दिला आणि सांगितले की नगरसेवकांचा निर्णय सत्तेच्या मागे न लागता विकासाच्या प्रतिबद्धतेमुळे प्रेरित आहे.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, “जनतेने या नगरसेवकांना निवडून दिले आणि त्यांनी नागरिकांना विकासाचे आश्वासन दिले होते. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार गतिमान आहे आणि न्याय, विकास देण्यास सक्षम आहे असे त्यांना वाटते.”

निवडणुकीनंतरच्या, पारंपारिकपणे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या भाजप आणि काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र येऊन अंबरनाथ विकास आघाडी (AVA) नावाची सत्ताधारी आघाडी स्थापन केली. ज्यामुळे सर्वात मोठा पक्ष असूनही शिवसेनेला बाजूला ठेवण्यात आले. एका अपक्ष नगरसेवकाच्या पाठिंब्याने, युतीने ३२ सदस्यांसह बहुमताचा आकडा ओलांडला.

भाजपसोबतच्या झालेल्या युतीमुळे काँग्रेसने अंबरनाथमधील त्यांच्या सर्व १२ नवनिर्वाचित नगरसेवकांना, ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांना निलंबित केले. तसेच त्यानंतर त्यांनी स्थानिक ब्लॉक युनिट बरखास्त केले. काही तासांनंतर, निलंबित नगरसेवकांनी पक्ष बदलला आणि भाजपमध्ये सामील झाले.

रवींद्र चव्हाण म्हणाले की, या निर्णयामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील वाढता विश्वास दिसून येतो, ज्यामध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. त्यांना असे वाटते की भाजपच्या माध्यमातूनच लोकांना दिलेली आश्वासने प्रभावीपणे पूर्ण केली जाऊ शकतात, असे ते पुढे म्हणाले. दरम्यान, महायुतीचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आणि या घडामोडींना ‘युती धर्माचा’ विश्वासघात म्हटले.

हे ही वाचा:

अमेरिका रशियन तेल खरेदीदार देशांवर ५००% कर लावणार?

कामगिरी मूल्यांकनाच्या बहाण्याने नेमबाजी प्रशिक्षकाचा अल्पवयीन खेळाडूवर बलात्कार

बांगलादेश सीमेवरून बनावट नोटा रॅकेटची मुख्य सूत्रधार गजाआड

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचे निधन

इतरत्र अशाच प्रकारच्या घडामोडींमुळे वाद आणखी वाढला आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपरिषदेत भाजपने असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमशी हातमिळवणी केली. या प्रकरणी भाजप आमदार प्रकाश भारसाखळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक भाजप नेत्यांना काँग्रेस आणि एआयएमआयएमशी मंजुरीशिवाय युती केल्याबद्दल फटकारले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा