भारत-पाकिस्तान युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धातील नेतृत्वाचा उल्लेख करून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. मात्र, काँग्रेस नेते शशि थरूर यांची याबद्दलची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे. त्यांनी स्पष्ट सांगितले की १९७१ आणि २०२५ च्या परिस्थितीमध्ये मोठा फरक आहे. ते म्हणाले की, १९७१ मध्ये भारताने एक नैतिक लढा दिला होता. लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिले. आजच्या परिस्थितीत तशी स्पष्ट ध्येय नाही. PoK मुक्त करणे सारखी स्पष्ट उद्दिष्ट नसल्यास दीर्घकाळ युद्ध चालू ठेवणे शहाणपणाचे नाही.”
हे ही वाचा:
भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!
पुलवामाच्या हत्याकांडात सहभाग असल्याची पाकचीच कबुली!
“इंग्लंडची कसोटी मोहिम – कोहली विना अशक्य?
शशी थरूर म्हणाले की, माझ्या मते, भारत पाकिस्तान संघर्षातून परिस्थिती बिघडत होती. आपल्याला शांतता हवी आहे. १९७१ची परिस्थिती आणि आजची परिस्थिती वेगळी आहे. आपण बऱ्याच यातना सहन केल्या आहेत. पुंछमधील लोकांना विचारा, किती लोक मरण पावले आहेत. युद्ध सुरू ठेवण्याची वेळ असेल तेव्हा ते करायला हवे, पण यावेळी आपल्याला फक्त दहशतवाद्यांना धडा शिकवायचा होता. तो शिकवला गेला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील (26 निष्पाप नागरिक मृत्यू) दोषींना पकडण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू राहील. यात वेळ लागू शकतो, पण ते आवश्यक आहे, असेही थरूर म्हणाले.
युद्धविराम योग्य निर्णय
“या संघर्षात अपंगत्व आणि नुकसान टाळणे आवश्यक होते. भारताचे प्राधान्य विकास, प्रगती आणि भारतीय नागरिकांचे कल्याण असले पाहिजे.







