27.6 C
Mumbai
Saturday, October 17, 2026
घरराजकारणराहुल गांधींची 'झूठ की गुंज'; दिशाभूल करणाऱ्या दाव्याना प्रत्युत्तर

राहुल गांधींची ‘झूठ की गुंज’; दिशाभूल करणाऱ्या दाव्याना प्रत्युत्तर

२९ दावे खोटे, ११ दावे दिशाभूल करणारे असल्याचा दावा

Google News Follow

Related

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विद्यार्थी आणि तरुणांशी संबंधित भाषणांमधील दाव्यांवर ‘झूठ की गूंज’ या वेबसाइटने प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘छात्रों की गूंज’ला प्रत्युत्तर म्हणून ही वेबसाइट सुरू करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, राहुल गांधी यांच्या चार रॅलींमधील ४० दाव्यांची तथ्यपडताळणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

वेबसाइटवरील माहितीनुसार, या ४० दाव्यांसाठी १३४ स्रोतांचा आधार घेण्यात आला आहे. त्यापैकी २९ दावे खोटे, तर ११ दावे दिशाभूल करणारे असल्याचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भाषणांमध्ये करण्यात येणाऱ्या आकडेवारीची आणि तथ्यांची स्वतंत्र स्रोतांच्या आधारे तपासणी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे.

या मोहिमेत कोटा, डेहराडून, प्रयागराज आणि पुणे यांसारख्या ठिकाणी झालेल्या भाषणांमधील दाव्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, वेगवेगळ्या रॅलींमध्ये रोजगार, सरकारी नोकऱ्या, नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि महिलांवरील अत्याचार यासंबंधी वेगवेगळी आकडेवारी मांडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

उदाहरणार्थ, एका रॅलीत ७० टक्के तरुण गिग वर्कर्स होतील, असा दावा करण्यात आल्याचं वेबसाइटवर नमूद आहे. दुसऱ्या भाषणात १५० जणांपैकी केवळ एकालाच सरकारी नोकरी मिळते, अशी आकडेवारी सांगण्यात आल्याचा दावा आहे. कोटा येथील भाषणातील नीट परीक्षेला बसणाऱ्या कुटुंबांकडून दरवर्षी १.३२ लाख कोटी रुपये घेतले जातात, या दाव्याचीही वेबसाइटवर पडताळणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पुण्यातील भाषणात भारतातील प्रत्येक १०० महिलांपैकी सहा महिलांवर बलात्कार होतो, असा दावा करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं असून, त्याचीही तथ्यपडताळणी करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

हिमनदीचा नैसर्गिक बांध तुटला अन् नेपाळमध्ये महाप्रलय!

नेपाळच्या महापुरात जवळपास ३०० भारतीय पर्यटक बेपत्ता

ईदच्या मिरवणुकीदरम्यान लालबाग-परळमध्ये राडा; दोन गटांत हाणामारी

सीमावाद सोडवण्यासाठी भारत- चीनची आठ मुद्द्यांवर सहमती

या वेबसाइटचा दावा आहे की, राहुल गांधी यांच्या भाषणांमध्ये ठिकाण बदललं तरी आकडेवारी बदलते, मात्र मांडणीची पद्धत कायम राहते. त्यामुळे प्रत्येक दावा स्वतंत्रपणे तपासून त्यामागील स्रोत आणि उपलब्ध आकडेवारी जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा