29 C
Mumbai
Friday, December 26, 2025
घरराजकारणतामिळनाडूत ९७ लाख मतदार वगळले

तामिळनाडूत ९७ लाख मतदार वगळले

एसआयार योजनेतून आली माहिती समोर

Google News Follow

Related

निवडणूक आयोगाने १९ डिसेंबर रोजी तामिळनाडूची एकत्रित मसुदा मतदार यादी जाहीर केली, ही यादी विशेष सखोल पुनरावलोकन (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन – SIR) प्रक्रियेनंतर तयार करण्यात आली आहे.

जिल्हा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या प्रक्रियेदरम्यान एकूण ९७ लाख मतदारांची नावे मसुदा मतदार यादीतून वगळण्यात आली. वगळण्यात आलेल्या मतदारांमध्ये

२६ लाख ९४ हजार ६७२ मतदार मृत असल्याचे नोंदवले गेले,

६६ लाख ४४ हजार ८८१ मतदार स्थलांतरित (इतर ठिकाणी गेलेले) असल्याचे आढळले, तर ३ लाख ३९ हजार २७८ मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदलेली असल्याचे निष्पन्न झाले.

एसआयआर प्रक्रियेनंतर तामिळनाडूमधील एकूण मतदारसंख्या ५.४३ कोटींवर आली आहे. यामध्ये २.६६ कोटी पुरुष मतदार, २.७७ कोटी महिला मतदार, आणि ७१९१ तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) मतदार यांचा समावेश आहे.
याआधी, २७ ऑक्टोबर २०२५ रोजी ही संख्या ६.४१ कोटी इतकी होती.

कोयंबतूर जिल्ह्यात मसुदा मतदार यादीतून ६.५० लाख मतदारांची नावे काढण्यात आली.दिंडीगुल जिल्ह्यात २.३४ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली, त्यामुळे एकूण मतदारसंख्या पूर्वीच्या १९.३५ लाखांवरून १६.०९ लाखांपर्यंत कमी झाली.

करूर जिल्ह्यात ७९६९० मतदारांची नावे काढण्यात आली, ज्यामुळे मतदारसंख्या ८.७९ लाखांवरून ८.१८ लाखांवर आली.

कांचीपूरम जिल्ह्यात २.७५४ लाख मतदारांची नावे हटवण्यात आली.

चेन्नईतील परिस्थिती

चेन्नईमध्ये एसआयआर मसुदा यादीतून १४.२५ लाख मतदारांची नावे वगळण्यात आली. यामुळे शहरातील एकूण मतदारसंख्या ४०.०४ लाखांवरून थेट २५.७९ लाखांपर्यंत घटली.

वगळण्यामागील कारणे पुढीलप्रमाणे 

१.५६ लाख मतदार मृत असल्याचे आढळले,

२७३२३ मतदार दिलेल्या पत्त्यावर सापडले नाहीत,

१२.२२ लाख मतदार स्थलांतरित झाल्याचे नोंदले गेले,

आणि १८७७२ प्रकरणे दुहेरी मतदान नोंदणीची असल्याचे समोर आले.

हे ही वाचा:

उत्तर प्रदेश: सपा नेत्याचा वक्फ बोर्डाच्या कब्रस्तानवर कब्जा!

झारखंडचा ऐतिहासिक विजय

हिंदू तरुणाच्या हत्येनंतर युनूस सरकारने दिले स्पष्टीकरण; काय म्हटले?

भारतातील सर्वाधिक पसंती मिळालेल्या १० ट्विटपैकी आठ ट्विट पंतप्रधान मोदींचे

या सर्व कारणांमुळे चेन्नईतील मोठ्या प्रमाणावर मतदार वगळले गेले असल्याचे निवडणूक आयोगाच्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. ही मतदार यादी राज्यभर निवडणूक आयोगाने राबवलेल्या विशेष सघन पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेनंतर प्रकाशित करण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या मुख्य निवडणूक अधिकारी अर्चना पटनाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शोलिंगनल्लूर आणि पल्लावरम या विधानसभा मतदारसंघांमध्ये मसुदा यादीत सर्वाधिक मतदार नावे वगळण्यात आली आहेत. काही विशिष्ट समुदायांची नावे मुद्दाम काढून टाकली जात असल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी इंडिया टुडेला स्पष्ट केले की, योग्य प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कोणतेही नाव मनमानी पद्धतीने वगळले जाऊ शकत नाही.

मसुदा एसआयआर यादीवर प्रतिक्रिया देताना एआयएडीएमकेचे नेते एडप्पाडी के. पलानीस्वामी म्हणाले,
“या प्रक्रियेत ९० लाखांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आल्याच्या बातम्या आहेत. यातील बहुतांश मतदार हे बनावट (फेक) मतदार होते. त्यामुळेच एआयएडीएमके सुरुवातीपासूनच ही एसआयआर प्रक्रिया का आवश्यक आहे, हे सांगत होती, ते सिद्ध होते.
डीएमके आता बनावट मतांच्या आधारे आणि लोकशाही मूल्ये वाकवून सत्तेत येण्याचे स्वप्न भंग पावल्यामुळे संताप आणि अस्वस्थतेत आक्रोशात्मक नाटके रचत आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा