मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी नाशिकचे ठाकरे गटाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधात्मक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सलीम कुत्ताच्या डान्स पार्टीमध्ये ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. नाशिक पोलिसांनी अखेर या प्रकरणात बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुधाकर बडगुजर यांची पार्टी प्रकरणात चौकशी सुरु होती. हिवाळी अधिवेशनात देखील हा मुद्दा गाजला होता. नाशिक पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुधाकर बडगुजर प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे दिला होता. गुन्हे शाखेने चौकशी करून अहवाल आयुक्तांना सादर केला आहे. अहवालानुसार सलिम कुत्तासमवेत झालेल्या डान्स पार्टीत सुधाकर बडगुजर उपस्थित होते असे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर बेकायदेशीर कृत्य केल्याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हे ही वाचा:
तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक
जामतारामध्ये भीषण अपघात; १२ प्रवाशांना रेल्वेने चिरडले
पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांपर्यंत पॅकेज पोहोचण्याआधी लुटले जायचे!
‘कलम ३७०’ने ५० कोटींचा टप्पा ओलांडला
सलिम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीरा मोईद्दीन शेख याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १७ ते १८ जणांची चौकशी या प्रकरणी करण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर हे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत. विधिमंडळात भाजपा आमदार नितेश राणे यांनी ते कुत्तासोबत झालेल्या डान्स पार्टीत नाचल्याचे प्रकरण उपस्थित केले होते. नितेश राणे यांनी पार्टीचे फोटो आणि व्हिडिओही विधानसभेत दाखवले होते. या नंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा केली होती.







