पंजाबमधील विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर मद्यधुंद अवस्थेत विधानसभेत आल्याचा आरोप केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून यासंबंधीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मद्यधुंद अवस्थेत विधानसभेला संबोधित केल्याचा आरोप आहे. काँग्रेस, भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांनी मुख्यमंत्री मान यांच्या विरोधात चौकशीची एकमताने मागणी केली आहे.
कामगार दिनाच्या विशेष अधिवेशनादरम्यान पंजाब विधानसभेत तणाव निर्माण झाला, कारण विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर दारूच्या नशेत सभागृहात उपस्थित राहिल्याचा आरोप केला. एका काँग्रेस आमदाराने मुख्यमंत्री दारूच्या नशेत विधानसभेत आले असल्याचा दावा केल्यानंतर हा वाद निर्माण झाला. विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा यांनी सर्व आमदारांची अल्कोहोल मीटर चाचणी करण्याची मागणी करून हा मुद्दा अधिकच तीव्र केला. बाजवा यांनी या प्रकरणी पंजाब विधानसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या चौकशीच्या कक्षेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांचाही समावेश असावा.
शिरोमणी अकाली दलानेही विधानसभेतील व्हिडिओ प्रसिद्ध करून आणि गंभीर आरोप करून मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला. कामगार दिनी दारू पिऊन भगवंत मान विधानसभेत आले ही बाब “अत्यंत लज्जास्पद” असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पक्षाने जनतेला सभागृहातील मुख्यमंत्र्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करण्याचे आवाहन केले आणि त्यांच्या वर्तनाचा तीव्र शब्दांत निषेध केला. सत्य बाहेर आणण्यासाठी भगवंत मान यांची पंजाबच्या जनतेसमोर डोप चाचणी व्हावी, अशी मागणी अकाली दलाने पुढे केली.
हे ही वाचा:
सुप्रियाताई तुमच्या सरकारने जे काम थांबवलं ते आम्ही पूर्ण केलं!
‘मिसिंग लिंक’ नाही, तर ‘कनेक्टिंग लिंक’!
‘मिसिंग लिंक’ची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
“या अल्लाह! दही भल्ला!” हा धर्माचा अपमान नाही!
दरम्यान, आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी मुख्यमंत्री मान यांची अल्कोहोल चाचणी करून दोषी आढळल्यास त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी केली. स्वाती मालीवाल यांनी एक्सवर लिहिले, “आज पुन्हा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान लोकशाहीचे मंदिर असलेल्या पंजाब विधानसभेत नशेत पोहोचले आहेत. हा माणूस दारू पिऊन गुरुद्वारा साहिबला जातो, दारू पिऊन मंदिरात जातो, दारू पिऊन लोकसभेत यायचा, दारू पिऊन सरकारी बैठकांना जातो, परदेशात इतकी दारू प्यायला की त्याला विमानातून उतरवावे लागले.”
पुढे त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी त्यांनी आपल्या आईच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा कधीही दारू पिणार नाही असे म्हटले होते. पंजाबसारख्या संवेदनशील सीमावर्ती राज्याचे मुख्यमंत्री नेहमी दारूच्या नशेत असतात. ते दारूच्या नशेत फाईल्सवर सह्या करतात. काय ही निर्लज्जता! जो माणूस फक्त झोपेत दारू सोडतो, तो पंजाबचा कारभार कसा चालवू शकतो? मुख्यमंत्री मान यांची अल्कोहोल चाचणी झाली पाहिजे आणि दोषी आढळल्यास त्यांना मुख्यमंत्री पदावरून बडतर्फ केले पाहिजे.
आज फिर से पंजाब CM भगवंत मान लोकतंत्र के मंदिर पंजाब विधानसभा में शराब के नशे में चूर होकर पहुँचे हैं।
ये आदमी गुरुद्वारा साहिब शराब पीकर जाता है, मंदिर शराब पीकर जाता है, लोकसभा शराब पीकर आता था, सरकार की मीटिंग में शराब पीकर जाता है, विदेश में इतनी शराब पीली की प्लेन से उतार… pic.twitter.com/M5VngsZ1sV
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) May 1, 2026







