28.6 C
Mumbai
Sunday, August 9, 2026
घरराजकारणअण्णा हजारे वृद्ध आहेत, आता त्यांच्यासारख्यांनी निवृत्ती घ्यावी...दिपकेचा जुना व्हीडिओ

अण्णा हजारे वृद्ध आहेत, आता त्यांच्यासारख्यांनी निवृत्ती घ्यावी…दिपकेचा जुना व्हीडिओ

जंतर मंतर आंदोलनावेळी केले होते वक्तव्य

Google News Follow

Related

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके याचा जंतर मंतरच्या आंदोलनादरम्यानचा एक व्हीडिओ व्हायरल होतो आहे. त्यात त्याने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्याबद्दल टिप्पणी केली होती. ज्यावरून त्याच्यावर टीका होत आहे.

दिपके याने पत्रकाराच्या एका प्रश्नाच्या उत्तरात हजारे यांना ‘वृद्ध’ संबोधत आश्रमात जाऊन बसण्याचा सल्ला दिला होता. त्याने म्हटले की, ६०-७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनी निवृत्ती घ्यायला हवी, मग ते राजकारणी असोत किंवा सामाजिक कार्यकर्ते.

पत्रकारांशी संवाद साधताना दिपकेला विचारण्यात आले की, त्याची टीम अण्णा हजारे यांची भेट घेणार का, त्यावर तो म्हणाला की,, “अजिबात नाही. मला वाटते की आता तरुणांनी गोष्टी आपल्या हातात घेतल्या पाहिजेत.”

हे ही वाचा:

श्रावणातील नियम मोडले अन् बुलडोझर धडकला!

भारताच्या परकीय चलनसाठ्यात विक्रमी झेप!

गोहत्या न करणारा खरा मुस्लिम…रामपूर पोलिस अधीक्षकांच्या वक्तव्याची चर्चा

होर्मुज सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर हल्ला

तो म्हणाला की, जे लोक ६०-७० वर्षांचे झाले आहेत त्यांनी निवृत्त व्हावे. मग ते राजकारण असो किंवा सामाजिक कार्य. त्यांनी निवृत्त होऊन आश्रमात जाऊन बसले पाहिजे. हा आपल्या भविष्याचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आम्हाला निर्णय घेऊ द्या. तो पुढे म्हणाले की, “अखेर वृद्ध लोकच किती काळ निर्णय घेत राहणार?”

दिपकेवर टीका

दीपके याच्या या वक्तव्यावर लोकांकडून जोरदार टीका केली गेली. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला की, जर त्याला वृद्ध लोकांची मदत नको असेल, तर ते सोनम वांगचुक यांच्याकडून उपोषण का करवून घेत आहेत, ज्यांचे वय सुमारे ६० वर्षे आहे.

समाजमाध्यमांवर लोकांनी म्हटले की, अभिजीत दीपके अण्णा हजारे यांच्यासारख्या वृद्ध व्यक्तींकडून प्रेरणा घेण्याची गरज नाही, असे म्हणत आहे, तर मग ते स्वतः उपोषण का करत नाही? ५९-६० वर्षांच्या सोनम वांगचुक यांना पुढे का करत आहे?

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
326,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा