31 C
Mumbai
Wednesday, December 10, 2025
घरराजकारणहा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा

हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा

Google News Follow

Related

हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे अशी प्रतिक्रिया एसटी कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यावर गुणरत्न सदावर्ते आज संध्याकाळी बाहेर आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांची पत्नी जयश्री पाटील, मुलगी आणि इतर समर्थक उपस्थित होते.

यावेळी बाहेर आल्यावर सदावर्ते यांनी हात उंचावत व्हिक्टरीची खूण दाखवली. तर हम है हिंदुस्थानी असे म्हणत घोषणा दिल्या. यावेळी त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी हार घालत त्यांचे स्वागत केले. यावेळी सदावर्ते यांनी हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे असे म्हटले आहे. देशभरातील कष्टकरी माझ्यापाठी उभे होते असे सदावर्ते म्हणाले. तर वंदे मातरम, जय श्रीराम आणि हम है हिंदुस्थानी म्हणणारे कधी हारत नसतात असे सदावर्तेंनी म्हटले आहे.

मी पाहिल्यांदा पोलीस कोठडीत असताना एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव वाचवला, त्यांना हार्ट अटॅक आला होता. मी कोठडीत योगाचे धडे दिले. त्यामुळे वाईट स्थितीतही चांगला माणूस चांगलं निर्माण करू शकतो. मी कोठडीत फक्त पाण्यावर राहिलो तरी हा कष्टकऱ्यांच्या आवाज थांबला नाही. मी बाबासाहेब आंबेडकरांचा वारसदार, श्रीरामांचा पाईक, आणि छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराजांचा मावळा. त्यामुळे मी कायम लढत राहीन. हे माझ्या कुटुंबाचे वचन आहे असे सदावर्तेंनी सांगितले.

हे ही वाचा:

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!

उत्तर प्रदेशमध्ये १७ हजार लाऊडस्पीकरचा आवाज केला कमी

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे आणि त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते हे गेल्या अनेक दिवसांपासून अटकेत आहेत. शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनासंदर्भात सदावर्ते यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सदावर्ते त्यांच्या विरोधात राज्यातील विविध पोलीस स्थानकांत तक्रारी करण्यात आल्या आणि गुन्हेही दाखल करण्यात आले.

पण अखेर न्यायालयाने सदावर्तेंना दिलासा दिला. त्यांना जमीन मंजूर करण्यात आला. तसेच अटकेपासून संरक्षणही देण्यात आले आहे. आज म्हणजेच मंगळवार २६ एप्रिल रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा