29 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारणतालिबानी आक्रमणामुळे अफगाण अर्थमंत्री पायउतार

तालिबानी आक्रमणामुळे अफगाण अर्थमंत्री पायउतार

Google News Follow

Related

अफगाणिस्तानचे कार्यवाहक अर्थमंत्री खालिद पायंदा यांनी राजीनामा दिला आहे. यासंबंधी वृत्ताला दुजोरा अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद रफी ताबे यांनी दिला. तालिबानने धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा गझनी शहरावर आता ताबा मिळवला आहे.

तालिबानने कंदाहारवर आता हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे, नागरिक आता काबूलकडे धाव घेत आहेत. कंदाहार आता पूर्णपणे रिकामे करण्यात आलेले आहे. . पायंडा यांनी राजीनामा देऊन देश सोडलेला आहे. याकरता त्यांनी ट्विट करून आपण पद सोडत असल्याची माहिती दिली. तसेच ठोस असे कुठलेही कारण पायंडा यांनी दिले नाही.

नवीन नियुक्ती जाहीर होईपर्यंत सीमा शुल्क आणि महसूल उपमंत्री आलेम शाह इब्राहिमी प्रभारी असतील.

तालिबानने अलिकडच्या दिवसांत अनेक प्रांतीय राजधानींवर कब्जा केला आहे. दहशतवाद्यांनी अनेक महत्त्वाच्या कस्टम पोस्ट्सही ताब्यात घेतल्या आहेत ज्यामुळे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्या सरकारला केवळ गेल्या महिन्यात आयात शुल्कात $ 30 दशलक्ष इतका तोटा सहन करावा लागला. अफगाणिस्तानच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या सुमारे अर्धा हिस्सा हा कर आहे.

हे ही वाचा:

‘ठाकरे सरकारमध्ये समन्वय आहे कुठे?’

संसदेतल्या गोंधळाचे ‘पोस्टमॉर्टम’! वाचा काय घडले

महापौरांनी पदक दातात धरले आणि…

चोरीनंतर आरोपी गेले मद्यखरेदीसाठी आणि अडकले पोलिसांच्या जाळ्यात

 

तालिबानने उत्तर अफगाणिस्तानातील दुसर्‍या शहराचा ताबा घेतला, एका अधिकाऱ्याने सांगितले की, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील परदेशी सैन्याने माघार घेतल्याने, सहा दिवसात आठ शहरे ताब्यात घेतली गेली आहेत. तसेच तालिबान्यांनी ईशान्य बदाखशान प्रांताची राजधानी फैजाबादवर कब्जा केला. तालिबानच्या कचाट्यात आता दहावी प्रांतीय राजधानी आलेली आहे. बदाखशानच्या प्रांतीय परिषदेच्या सदस्याने सांगितले की, तालिबान्यांनी मंगळवारी हल्ला करण्यापूर्वी फैजाबादला वेढा घातला होता. काही तासांच्या जोरदार लढाईनंतर एएनडीएसएफ मागे हटले. फैजाबादनंतर आता जवळपास संपूर्ण ईशान्य भाग तालिबानच्या ताब्यात आला आहे. बदाखशानची सीमा ताजिकिस्तान, पाकिस्तान आणि चीनशी आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा