27.8 C
Mumbai
Friday, May 3, 2024
घरराजकारणजेव्हा अजित दादाच मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत

जेव्हा अजित दादाच मुख्यमंत्र्यांना जुमानत नाहीत

पंढरपूर पोट-निवडणुकीसाठी आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सभा घेतली. मात्र या सभेत कोरोना नियमांना सपशेल पायदळी तुडवण्यात आल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे ही सभा अजित पवारांना भोवणार का?

Google News Follow

Related

आज पंढरपूर- मंगळवेढा पोट-निवडणुकीसाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रावादीचे उमेदवार भालचंद्र भालके यांची प्रचार सभा घेतली. मात्र या प्रचारसभेवर कोरोना निर्बंधांच्या पायमल्लीचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

राज्यभरात सध्या रुग्णवाढ भयावह वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. यात राजकीय सभांना देखील परवानगी नाही. असे असताना खुद्द उपमुख्यमंत्र्यांनी कोरोनाविषयक नियम पायदळी तुडवून पंढरपूरमध्ये राजकीय सभा घेतली कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याबरोबरच सामान्य नागरीकांवर कोरोनाविषयक नियम तोडल्यास कारवाई केली जाते, त्याप्रमाणे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल होणार का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

हे ही वाचा:

लसींचं राजकारण बंद करा

मोदी सरकारच्या निर्णयामुळे आता ‘या’ वस्तू होणार स्वस्त

वाझेचे पत्र गंभीर असून विचार करायला लावणारे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार लोकांना सोशल डिस्टसिंग पाळा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करा असे सांगत असतात, मात्र त्यांचे उपमुख्यमंत्री हे जुमानताना दिसले नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील लोकांना, सरकारला सहाय्य करण्याचा त्याप्रमाणे या काळात कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले होते. अजित पवारांनी स्वतःच या आवाहनाला देखील हरताळ फासल्याचे दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा