“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”

भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांची राहुल गांधींवर टीका

“राहुल गांधी नव्या युगाचे मीर जाफर”

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. एकीकडे, जगभरात या मोहिमेचे कौतुक होत असताना भारत सरकारही या ऑपरेशनच्या यशाबद्दल देशात आणि परदेशात मोहीम राबवत आहे. तर, कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी मात्र सरकारकडे या कारवाईचा हिशेब मागण्यात व्यस्त आहेत. यावरून आता भाजपा नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.

भारताने किती विमाने गमावली असा सवाल राहुल गांधी करत असून याला भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी जोरदार उत्तर दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, “राहुल गांधी पाकिस्तान आणि त्याच्या उपकारकर्त्यांची भाषा बोलत आहेत यात आश्चर्य नाही. त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केलेले नाही, जे भारताचे वर्चस्व स्पष्टपणे दाखवत आहे. उलट, ते वारंवार विचारतात की आपण किती विमाने गमावली. हा प्रश्न डीजीएमओच्या ब्रीफिंगमध्ये आधीच उपस्थित केला गेला आहे. विचित्र गोष्ट म्हणजे, त्यांनी एकदाही विचारले नाही की संघर्षादरम्यान किती पाकिस्तानी विमाने पाडण्यात आली किंवा भारतीय सैन्याने पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला तेव्हा किती विमाने पाडण्यात आली,” अशी टीका राहुल गांधी यांच्यावर करण्यात अली आहे. या पोस्टसोबत अमित मालवीय यांनी एक फोटोही पोस्ट केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अर्धा चेहरा आणि राहुल गांधींचा अर्धा चेहरा दिसत आहे.

हे ही वाचा:

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड

राजधानी एक्स्प्रेसला घातपात करण्याचा होता कट

“अमेरिका दहशतवाद्याला भारताच्या ताब्यात देऊ शकते, तर पाकिस्तान का नाही?”

तुर्कीयेच्या सेलेबी कंपनीचा परवाना का रद्द केला? भारत सरकारने स्पष्ट केलं कारण

अमित मालवीय यांनी आणखी एक व्यंगचित्र शेअर करत राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी हे नव्या युगाचे मीर जाफर आहेत. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना प्रश्न विचारला होता आणि म्हटले होते की पाकिस्तानला हल्ल्याची आगाऊ माहिती देणे ही चूक नव्हती तर गुन्हा होता आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे.

Exit mobile version