उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा ट्रेन उलटवण्याचा कट रचल्याची घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यात राजधानी एक्सप्रेससह दोन गाड्या रुळावरून घसरवण्याचा प्रयत्न उधळण्यात आला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे अपघात टळला असल्याचे समोर आले आहे.
सोमवारी संध्याकाळी, अज्ञातांनी दलेलनगर आणि उमरताली स्थानकांदरम्यान ११२९/१४ किलोमीटर अंतरावर ट्रॅकला अर्थिंग वायर वापरून लाकडी ब्लॉक बांधले, असे पोलिसांनी सांगितले. याचंवेळी दिल्लीहून आसाममधील दिब्रुगडला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस (२०५०४) च्या लोको पायलटने हे ब्लॉक पाहताच आपत्कालीन ब्रेक लावला. तसेच याची माहिती संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना देण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. राजधानी एक्सप्रेसच्या पाठोपाठ काठगोदाम एक्सप्रेस (१५०४४) रुळावरून घसरवण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे तो टळला, असे पोलिसांनी सांगितले.
Information was received about a piece of wood lying on the train track (pillar number 1129/14) between Dalelnagar and Umratali railway stations at Kachhauna police station. When the information was received, GRP and local police immediately reached the spot and inspected it. On… pic.twitter.com/2uf5gXkelZ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) May 20, 2025
सोमवारी संध्याकाळी अधीक्षक नीरज कुमार जदौन यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि आवश्यक सूचना दिल्या, असे अहवालात म्हटले आहे. त्यांनी पुष्टी केली की सरकारी रेल्वे पोलिस, रेल्वे संरक्षण दल आणि स्थानिक पोलिसांचे पथक घटनांचा तपास करत आहेत. “कछौना पोलिस स्टेशनला दलेलनगर आणि उमरतली रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे ट्रॅकवर (खांब क्रमांक ११२९/१४) लाकडाचा तुकडा पडला असल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच जीआरपी आणि स्थानिक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्याची पाहणी केली. तपासात असे आढळून आले की लाकडाचा तुकडा लोखंडी पट्ट्याला बांधलेला होता. या प्रकरणाच्या संदर्भात, रेल्वे विभाग / स्थानिक पोलिस घटनेच्या सर्व मुद्द्यांची सखोल चौकशी करत आहेत. इतर आवश्यक कारवाई सुरू आहेत,” असे हरदोई पोलिसांनी म्हटले आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, जौनपूर पोलिसांनी औंका गाव बक्ष पोलीस ठाण्याजवळील रेल्वे ट्रॅकवर स्टीलचा ड्रम ठेवून ट्रेन रुळावरून घसरण्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे अफजल अली उर्फ सोनू आणि अफजल अली अशी आहेत, दोघेही औंका गावातील आहेत. रेल्वे संरक्षण दलाच्या (आरपीएफ) वेळीच कारवाईमुळे त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. अटकेनंतर दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला, त्यानंतर त्यांना रेल्वे कायद्याच्या कलम १५१ आणि १५३ अंतर्गत तुरुंगात पाठवण्यात आले. पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.
