केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. यावेळी आयोजित सभेत ते म्हणाले की, ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला हे स्पष्ट संदेश दिला आहे की कोणीही भारतीय लष्कर, त्याचे नागरिक किंवा सीमा यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्याला परिणाम भोगावे लागतील.
शिवसेना उबाठावर पलटवार करताना अमित शाह म्हणाले,
“आज जर बाळासाहेब ठाकरे असते, तर त्यांनी पंतप्रधान मोदींचे ऑपरेशन सिंदूरसाठी कौतुक केले असते. पण शिवसेना उबाठाचे एक नेते म्हणतात की, हे प्रतिनिधीमंडळ म्हणजे वरात आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा हाच पक्ष होता. मला माहित नाही उद्धव ठाकरेंच्या सेनेला काय झाले आहे. त्यांच्या स्वतःच्या सदस्यांचा यामध्ये समावेश असूनही ते अशा प्रकारे बोलत आहेत.”
“उरीवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला. पुलवामावर हल्ला झाला तेव्हा आम्ही एअर स्ट्राईक केला. आणि जेव्हा पहलगाममध्ये हल्ला झाला, तेव्हा आम्ही ऑपरेशन सिंदूर केले आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी निर्णय घेतला की हे देशाचं प्रकरण आहे आणि म्हणून सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ विविध देशांना भेट देईल व पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगासमोर मांडेल.”
हे ही वाचा:
सिंदूर पुसणाऱ्यांचा नाश निश्चित!
नवव्या जागतिक ड्रोन परिषदेत बघा काय घडलं!
देशात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा कहर
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सीमेवरील परिस्थिती काय ?
“पाकिस्तान विसरतोय की ११ वर्षांपूर्वी तिथे काँग्रेसचे सरकार होते. आता परिस्थिती बदलली आहे. ७ मे रोजी केवळ २२ मिनिटांत आम्ही ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीममुळे पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रांना व ड्रोनना आमच्या जमिनीला स्पर्शही करता आला नाही.”
नक्षलवाद नष्ट करण्याची घोषणा
“ऑपरेशन सिंदूरसोबतच ‘ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट’ सुद्धा राबवले गेले. छत्तीसगढमध्ये या ऑपरेशनद्वारे ५००० फूट उंचीवर नक्षलवादी ठिकाणे नष्ट करण्यात आली आणि ३१ नक्षलवादी ठार करण्यात आले. आतापर्यंत ३६ नक्षलवादी ठार झाले, अनेकांनी आत्मसमर्पण केले आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद संपवू.”
मराठी भाषा व महाराष्ट्रविषयी
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा देऊन गौरव केला. महायुती सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्नशील आहे.”







