28.7 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरराजकारणबॅलेटवरही काँग्रेसचा सूपडा साफ झाला... २०२९ मध्येही हरायला तयार व्हा!

बॅलेटवरही काँग्रेसचा सूपडा साफ झाला… २०२९ मध्येही हरायला तयार व्हा!

गृहमंत्री अमित शहा यांची 'एक लोहार की'

Google News Follow

काँग्रेस नेते राहुल गांधी गेले बरेच दिवस मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत आहेत. देशाचे गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी राहुल गांधी यांची ‘सौ सुनार की’ झाल्यानंतर आता ‘एक लोहार की’ दिलेली आहे. सिलचर त्रिपुरा निवडणुकांत तुमचा बॅलेटवर पराभव झाला. आता २०२९ च्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा तुम्ही हरणार असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीका करताना, निवडणुकांमधील पराभवाचे खापर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (एसआयआर) फोडले जात असल्याचा आरोप केला. पण ते खापर फोडलेत तरी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला सलग चौथ्यांदा पराभवाचा सामना करावा लागणार आहे. माध्यमांमध्ये कृत्रिम वातावरण निर्माण करून आणि खोटे पसरवून आता तुम्ही जनतेचा विश्वास संपादन करू शकत नाही. वारंवार निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसने निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे, असे अमित शाह यांनी म्हटले.

“राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी सांगू इच्छितो की, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या पराभवाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) प्रचंड बहुमताने विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि काँग्रेसचा सलग चौथ्यांदा पराभव होणार आहे,” असे अमित शाह म्हणाले.

हे ही वाचा:

गुहागर येथे ‘फिल्म टूरिझम’ प्रकल्प उभा राहणार?

आंदोलनजीवींना घेरी येईल हे आकडे पाहून…

एआयमुळे खर्च वाढल्याने झोहो कर्मचाऱ्यांना यंदा वेतनवाढ नाही!

फेसबुक लाईव्ह दरम्यान अमली पदार्थविरोधी कार्यकर्त्यावर झाडल्या गोळ्या

गुजरात विजयाचा दिला दाखला

गुजरातमधील तीन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने १०४ पैकी ९० जागा जिंकल्यानंतर अमित शाह यांनी हे वक्तव्य केले. या तीन संस्थांमध्ये गांधीनगर महानगरपालिका तसेच ओखा आणि थारा नगरपालिका यांचा समावेश आहे. गांधीनगर महानगरपालिकेच्या ४४ जागांपैकी भाजपने ३८ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला पाच जागा मिळाल्या. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. आम आदमी पक्षाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत लढवलेल्या ३२ जागांपैकी एकही जागा जिंकता आली नाही. अमित शहा म्हणाले की, १९८५ पासून काँग्रेसला गुजरातमध्ये एकही निवडणूक जिंकता आलेली नाही, असाही दावा अमित शाह यांनी केला.

आसाम, पश्चिम बंगाल, तमिळनाडू आणि पुद्दुचेरी येथील अलीकडील पोटनिवडणुका तसेच राजस्थान आणि त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेसच्या पराभवासाठी केवळ मतदार याद्या किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवरील (ईव्हीएम) आरोपांना जबाबदार धरता येणार नसल्याचे सांगितले.

त्रिपुरातील स्थानिक निवडणुका मतपत्रिकेद्वारे झाल्याचा उल्लेख करत अमित शाह म्हणाले की, भाजपचे विजय केवळ ईव्हीएममुळे होतात, या आरोपांना ते उत्तर आहे.

‘काँग्रेसचा गावांमध्ये जनसंपर्क नाही’

राहुल गांधी दिल्लीमध्ये विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र करून आंदोलन करतात म्हणून ते संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करू शकत नाहीत, असे अमित शाह म्हणाले. “देशाचा आवाज शेतांमध्ये, खळ्यांमध्ये, गावांमध्ये, दुर्गम डोंगरांमध्ये, जंगलांमध्ये आणि अगदी नद्यांच्या काठावरही आहे. तिथे तुमची पोहोच नाही,” अशी टीका त्यांनी केली. काँग्रेसचा मतदारांशी संपर्क नसल्याचा आरोप करत अमित शाह यांनी एसआयआरवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप केला.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा