29.3 C
Mumbai
Friday, November 6, 2026
घरराजकारणदेशमुख, परमबीर गेले हनिमूनला?

देशमुख, परमबीर गेले हनिमूनला?

Google News Follow

माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे सध्या गायब आहेत. त्यावरूनच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, तसेच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे हनिमूनला गेले का? असा खोचक सवाल अमृता फडणवीस यांनी विचारला आहे.

मुंबईतील सीपी टँक रोड इथे देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलाताना अमृता फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. अनिल देशमुख आणि परमबीर सिंग यांच्याकडून तपासाला सहकार्य केले जात नसल्याच्या प्रश्नावर त्यांनी म्हटले की, ‘त्यांना मस्ती आली आहे. त्यांचे हनिमून कुठे सुरु आहेत याची माहिती शोधायला हवी. पण हे व्हायला नको ही खरी गोष्ट आहे. तुम्हाला पण कुठे दिसले तर रिपोर्ट करा. त्यांना लवकर पकडता येईल.’ असेही त्या म्हणाल्या.

हे ही वाचा:

अखेर ठाकरे सरकारला जाग! महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रूपाली चाकणकर

जामीन नाहीच; आर्यन खानचा तुरुंगमुक्काम वाढला

फेसबुकचे नव्याने बारसे होणार

आर्यन खानचे काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी

त्याचबरोबर ड्रग्स (अमलीपदार्थ) प्रकरणात एनसीबीकडून सुरु असलेल्या कारवाईचेही त्यांनी समर्थन केले आहे. ‘इथे लोक ड्रग्स घेऊन फिरतात. यावर काम करावे की नाही करावे, महाराष्ट्र प्रगतीच्या दृष्टीने पुढे जावा की ड्रग्स कॅपिटल बनावा हे आपल्यालाच ठरवायचे आहे’ असे त्या म्हणाल्या. ‘तरुण पिढीला तुरुंगात टाकावे हा माझा वैयक्तिक विचार नाही. त्यांना सुधारणागृहाची जास्त गरज आहे. पण त्या आधी ते कुठून येतंय, त्याचं नेटवर्क काय आहे हे कळायला पाहिजे. ते कळल्यावर त्या मुलाला तुरुंगाची नाही, तर सुधारगृहाची आणि काऊन्सिलिंगची गरज असते’, असेही त्या म्हणाल्या.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा