28 C
Mumbai
Friday, March 20, 2026
घरक्राईमनामाओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; अपघात की घातपात?

ओमराजेंच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न; अपघात की घातपात?

पोलिसांकडून डम्पर चालकाला अटक

Google News Follow

Related

ठाकरे गटाचे नेते आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे अपघातामधून थोडक्यात बचावले आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डम्पर घालण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून ‘न्यूज १८ लोकमत’ने याविषयीचे वृत्त दिले आहे. ओमराजे हे सकाळी व्यायामाकरिता बाहेर पडले असताना ही घटना घडली असून ओमराजे यातून थोडक्यात बचावले आहेत. पोलिसांनी डम्पर चालकाला अटक केली आहे.

ओमराजे निंबाळकर हे सकाळी ७ वाजता वॉकला बाहेर पडले होते. त्यावेळी गोवर्धनवाडी येथे भरधाव डम्पर त्यांच्या अंगावर आला. त्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी भरधाव डम्परचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं चालकानं पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ही घटना चुकीने घडली की या मागे काही घातपाताचा प्रकार आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

हे ही वाचा:

चीनी कंपनी शाओमी टेक्नोलॉजीला ईडीचा दणका

रामायण फेम दीपिका चिखलियांची ‘आदिपुरुष’मधील कृती सॅननवर टीका

धमक्या देण्याचा अधिकार फक्त मविआच्या नेत्यांना

इजिप्तमध्ये पर्यटकाला शार्कने नेले पाण्यात ओढून; व्हायरल व्हीडिओमुळे थरकाप

आपण सुखरूप असल्याची माहिती ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. या प्रकरणात डम्पर चालकाविरोधात कलम २७९, ३३६, १८४ अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
299,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा