33 C
Mumbai
Thursday, March 26, 2026
घरराजकारण...आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले

…आणि नवनीत राणांना अश्रू अनावर झाले

Google News Follow

Related

“अतिवृष्टी मुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले आहेत. गावागावांचा संपर्क तुटला आहे, क्षतीग्रस्त पुलांची पाहणी खासदार नवनीत रवी राणा यांनी केली. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.” असं ट्विट नवनीत राणा यांनी केलं आहे. यावेळी नवनीत राणा यांना पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झालं आहे. नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. अमरावती जिल्ह्यात उद्भवलेल्या या परिस्थितीनंतर लोकसभेच कामकाज आटोपून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्या. पाऊस सुरु असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागांची चिखलात जाऊन पाहणी केली. यावेळी मुसळधार पावसामुळं उद्भवलेली पूरस्थिती आणि शेतकऱ्यांचं झालेलं नुकसाना पाहून नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले.

अमरावतीतील पूरपरिस्थितीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकताना नवनीत राणा यांच्या अश्रूंचा बांध फुटला. पूरस्थितीमुळे जागोजागी चिखल, पाणी होतं. यातून वाट काढत त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. अमरावती जिल्ह्यातील अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झाले. अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक पूल खचले, गावगावांचा संपर्क तुटला, क्षतीग्रस्त पुलांची पाहणी करुन खासदार नवनीत राणा यांनी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा:

कारगिल हुतात्म्यांना देशवासियांकडून श्रद्धांजली

निकषांचा विचार न करता तातडीची मदत जाहीर करा

जनता तुमचो ह्यो माज उतरवल्या शिवाय रव्हची नाय!

मदतीची याचना करणाऱ्या महिलेवर भास्कर जाधवांची अरेरावी

अमरावतीतील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या समस्याही पाहाव्यात, असं म्हणत खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं. तसेच स्वतः गाडी ड्रायव्हिंग करत विदर्भात येऊन या नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जोपर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार कसं? मदत कशी दिली जाणार? असा थेट प्रश्नही खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
300,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा