24.5 C
Mumbai
Wednesday, January 21, 2026
घरराजकारण... आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा बिहारमध्ये ‘गमछा’ फिरवला

… आणि पंतप्रधान मोदींनी पुन्हा बिहारमध्ये ‘गमछा’ फिरवला

गमछा हलवण्याची कृती ही पंतप्रधान मोदींच्या बिहारमधील सभांचे वैशिष्ट्य बनली होती

Google News Follow

Related

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी गुरुवारी सकाळी ११:३० वाजता १० व्यांदा पदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर नितीश यांनी पंतप्रधान मोदींचा हात धरला आणि त्यांचे आभार मानले. समारंभ संपताच, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पारंपारिक शैलीचे प्रदर्शन केले आणि त्यांचा गमछा त्यांनी हवेत हलवला. लोकांनीही मोठा जल्लोष करत आपला उत्साह आणि पाठींबा दर्शवला.

भाजप, जेडीयू आणि इतर मित्रपक्षांच्या युती असलेल्या एनडीएने बिहार विधानसभा निवडणुकीत २०२ जागा जिंकल्या, तर महाआघाडीला ३५ जागांपर्यंतचं मजल मारता आली. त्यानंतरही पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील त्यांच्या मुख्यालयात विजयोत्सव साजरा करताना गमछा हवेत हलवला होता.

शपथविधी सोहळ्याच्या वेळी जेव्हा पंतप्रधान मोदींनी स्टेजवरून गमछा हलवला तेव्हा सम्राट चौधरी, विजय सिन्हा, नितीश कुमार आणि जवळ उभे असलेल्या इतरांनी टाळ्या वाजवल्या. पंतप्रधान मोदींच्या या हावभावाने जनताही उत्साहित झाली. लोकांनी यावेळी स्वतःचे गमछे, झेंडे, शाल हवेत हलवत नरेंद्र मोदींना उत्साहात प्रतिसाद दिला. समारंभाच्या शेवटी, नितीश कुमार पुन्हा पंतप्रधान मोदींकडे गेले. त्यांनी त्यांचा हात धरला आणि तो वर उचलला, केंद्र आणि राज्य सरकारांमधील ही भागीदारी सुरूच राहण्याचा संकेत दिला.

बिहारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘गमछा’ हलवणे हे एक नवीन राजकीय प्रतीक बनले होते. मुझफ्फरपूर येथे झालेल्या त्यांच्या सार्वजनिक सभेत, पंतप्रधानांनी त्यांच्या खास शैलीत गमछा हलवला होता. त्यावेळी समर्थकांच्या गर्दीत “मोदी, मोदी” च्या घोषणांचा आवाज दुमदुमला होता. पंतप्रधानांनी असा हावभाव करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. ऑगस्टमध्ये, त्यांनी औंठा-सिमारिया पुलाचे उद्घाटन केल्यानंतर गर्दीला गमछा हलवून दाखवला होता. त्यामुळे गमछा हलवण्याची कृती ही मोदींच्या बिहारमधील सभांचे वैशिष्ट्य बनली होती.

हे ही वाचा..

२००८ मध्ये झालेल्या दोन स्फोटांमध्ये अल- फलाहच्या माजी विद्यार्थ्याचा होता सहभाग

अल- फलाह विद्यापीठाच्या मालकाच्या मालमत्तेवर चालणार बुलडोझर?

भारताची वाटचाल स्वच्छ ऊर्जेकडे

४ कोटींहून अधिक किमतीचे ८४६.३० नशेचे पदार्थ नष्ट

पंतप्रधान मोदींच्या शैलीमागे एक खोल प्रतीकात्मक अर्थ आहे. भारतातील अनेक भागात, विशेषतः बिहार आणि बंगालसारख्या उष्ण आणि दमट राज्यांमध्ये, गमछा हे कामगार वर्ग आणि शेतकऱ्यांचे प्रतीक मानले जाते. ते केवळ घाम पुसण्यासाठी किंवा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी डोक्याभोवती बांधलेले कापड नाही तर ग्रामीण जीवनाचा एक महत्त्वाचा भाग देखील आहे. राजकीय पक्षांनी गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रचार आणि रॅलींमध्ये हे प्रतीक म्हणून स्वीकारले आहे. “गमछा हातात घेऊन जनतेकडे हात हलवणे, हा पंतप्रधानांचा लोकांशी थेट संवाद साधण्याचा आणि शेतकरी व कामगारांप्रती पाठिंबा दर्शविण्याचा एक प्रतीकात्मक इशारा आहे.”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा