28.7 C
Mumbai
Monday, October 19, 2026
घरक्राईमनामाअनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांची कोठडी वाढविली १४ दिवसांनी

अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांची कोठडी वाढविली १४ दिवसांनी

Google News Follow

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांच्या ईडी कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात दोन्ही आरोपींना आणखी १४ दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पालांडे आणि शिंदे आता २० जुलैपर्यंत अंमलबजावणी संचलनालयाच्या कोठडीत असतील.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या कथित १०० कोटींच्या वसुली प्रकरणाचा तपास ईडीकडून सुरु आहे. याच प्रकरणात देशमुखांचे दोन्ही पीए पालांडे आणि कुंदन यांच्याविरोधात ईडीच्या महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचाही समावेश आहे, असा दावा ईडीच्या वकिलांनी केला आहे. ईडीने संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना २५ जूनला ताब्यात घेतलं होतं. दोघं जण ईडीच्या चौकशीला सहकार्य करत नव्हते. त्यामुळे अखेर त्याच दिवशी रात्री ईडीने दोघांना बेड्या ठोकल्या. त्यानंतर ईडीने दोघांना न्यायालयात हजर केलं.

हे ही वाचा:

भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

१२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपाचे राज्यभर आंदोलन

‘शिवीगाळ’-‘निलंबन’ ‘नाट्या’नंतर भास्कर जाधवांचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

तुमच्या ‘बां’चं नाही, आमच्या ‘दिबां’चं नाव हवं

ईडीने आतापर्यंत केलेल्या तपासात अनिल देशमुख यांचे दोन्ही स्वीय सहाय्यक हे देखील दोषी असल्याचे आढळले आहे. जो पैशांचा गैरव्यवहार केला जायचा त्यामध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता, अशी माहिती ईडी अधिकाऱ्यांच्या तपासातून समोर आली आहे. देशमुख यांचा पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे हा व्यवहार निश्चित करायचा तर दुसरा पीए कुंदन शिंदे हा पैसे स्वीकारायचा, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे. दोघं स्वीय साहाय्यकांची सध्या चौकशी सुरु आहे. पण ईडी आता देशमुखांची पुन्हा चौकशी करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा